Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 12 फेब्रुवारी 2025: मूलांक 2 मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा !मूलांक 8 व्यवसायात उत्तम लाभ ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

12

Numerology Prediction, 12 February 2025 : आज बुधवार, असून मूलांक 1 च्या जातकांनी निर्णय घेताना घाई करु नये. मूलांक 4 साठी प्रत्येक कामात कठोर मेहनत आहे. मूलांक 8 चा व्यवसायात उत्तम लाभ तर मूलांक 9 चे जातक नेहमीप्रमाणे इतरांची मदत करतील. चला तर पाहूया मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aajche Ank bhavishya, 12 February 2025: आज मूलांक 1 सह या मूलांकासाठी दिवस चांगला आहे फक्त निर्णय घेताना सखोल विचार करा. मूलांक 6 सह या मूलांकासाठी व्यवसायात उत्तम नफा आहे फक्त वादविविदापासून दूर राहा. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

​मूलांक 1 – निर्णय घेताना घाई नको

आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि नेतृत्व घेवून येणारा आहे. तुमचे विचार आणि कृती इतरांवर प्रभाव टाकणार आहेत. कोणतीही नवीन योजना किंवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा आणि कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.

​मूलांक 2 – मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा

आजचा दिवस थोडा संवेदनशील असेल. नातेसंबंधात थोडा गोंधळ होऊ शकतो, म्हणून विचारपूर्वक संवाद साधा. तुमच्या बोलण्यात गोडवा हवा. तुमच्या भावनिक बाजूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. वादविवाद झाले तर शांततेत सोडविण्याचा प्रयत्न करा.

​मूलांक 3 – विचार सहजपणे व्यक्त करा

आजचा दिवस तुमच्यासाठी क्रिएटीव्ह आणि आनंदाचा आहे. तुमचा आत्मविश्वास आणि संवादामधील मधुरता लोकांना आकर्षित करेल. तुम्ही तुमचे विचार सहजपणे व्यक्त करू शकाल, ज्यामुळे तुमची कामे पटापट होतील. नवीन संधी येणार आहेत, थोडा धीर धरा आणि तुमचे विचार स्पष्टपणे मांडताना संकोच करु नका.

​​मूलांक 4 – प्रत्येक कामात कठोर मेहनत

आज दिवस अपार कष्टाचा आहे. तुम्ही जे काही कराल, त्यात कठोर मेहनत आणि संयमाची गरज आहे. तरीही, तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. ही वेळ योजना करण्यासाठी आणि जुन्या कामांना पूर्ण करण्यासाठी योग्य आहे. आत्मविश्वास ठेवा आणि यशाच्या दिशेने मेहनत करत राहा.

​मूलांक 5 – नवीन संधीचा लाभ घ्या

आजचा दिवस तुमच्यासाठी बदल आणि साहसी निर्णयांनी भरलेला आहे. तुमच्या दिनचर्येत देखील काही बदल अनुभवणार आहात. नवीन संधी तुमच्या समोर असेल त्याचा लाभ घ्या. प्रवास किंवा शिक्षण या संदर्भात काही प्रस्ताव आले तर त्वरित हो म्हणा. व्यापार, व्यवसायासाठी वेळ उत्तम आहे.

​मूलांक 6 – अनावश्यक वादविवाद टाळा

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असून कुटुंब आणि नातेसंबंध अधिक वृद्धींगत होतील. कुटुंबात प्रेम आणि सहकार्याची भावना मजबूत होईल. प्रियजनांबरोबर वेळ घालवण्याचं सुख मिळेल. अनावश्यक वादविवाद टाळा. प्रेम आणि समजूतदारपणाने पुढे चला, सगळी कामे होतील.

​मूलांक 7 – सखोल विचार करुन निर्णय घ्या

आजचा दिवस तुमच्यासाठी चिंतन आणि आत्मनिरीक्षणाचा आहे. तुम्ही काही वेळ एकटे राहा आणि तुमच्या मनात जे काही विचार आहेत किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे ते ठरवा. ही वेळ विचार करून त्वरित कृती करण्याची आहे. मानसिक शांततेसाठी ध्यान धारणार करा.

​मूलांक 8 – व्यवसायात उत्तम लाभ

आजचा दिवस व्यवसाय किंवा व्यापारासाठी उत्तम आहे. तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात यश मिळवू शकता, विशेषतः जे व्यवसाय किंवा गुंतवणुकीशी संबंधित असतील. तुमची मेहनत आणि समर्पण याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर वेळ योग्य आहे.

​मूलांक 9 – मदत करुन समाधान मिळेल

तुम्ही दयाळू आणि दुसऱ्यांना मदत करणाऱ्या आहात. आजचा दिवसही तुम्ही इतरांना मदत करणार आहात. त्यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. इतरांच्या समस्यांचे समाधान करण्याची तुमच्याकडे एक अद्भुत क्षमता आहे. ही वेळ तुमचा उद्देश पूर्ण करण्याची असून त्यासोबत जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची देखील आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.