Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Loveyapa Box office collection Day 5: अरेरे! जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लव्हयाप्पा' ची अशी अवस्था, पाच दिवसांत फक्त इतकीच कमाई
Loveyapa box office collection:बॉलिवूडच्या कलाकारांच्या मुलांचा सिनेमा म्हटलं की, चर्चा होतेच. आता खुशी कपूर आणि जुनैद खान यांचा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.

‘लव्हयाप्पा’ ही एक लव्हस्टोरी आहे. दोन्ही स्टार किड्स असल्यानं सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. खुशी कपूर आणि जुनैद खान यांनी प्रमोशनमध्ये कोणतीही कसर ठेवली नव्हती, पण तरी देखील सिनेमाला फार काही प्रतिसाद मिळाला नाहीये. सुरुवातीपासूनच कमाई कमी झाल्यानंतर निर्मात्यांसाठी हा धक्काच आहे. आता एका दिवसांत छावा सिनेमा येणार असल्यानं पुढच्या आठवड्यात सिनेमा थिएटरमधून बाहेर फेकला जाईल हे नक्की.
‘लव्हयाप्पा’नं पहिल्या दिवशी १.१५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत ४३.४८ टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या दिवशी सिनेमानं १.६५ कोटींची कमाई केली होती. तर दिसऱ्या दिवशीही सिनेमाच्या कमाईत थोडी वाढ झाली होती. तिसऱ्या दिवशी सिनेमानं १.७५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली, ही घट ६८.५७ टक्क्यांची होती. चौथ्या दिवशी सिनेमानं फक्त ५५ लाखांची कमाई केली होती. तर पाचव्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. पाचव्या दिवशी सिनेमानं फक्त ५० लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंतची एकूण कमाई ही ५.६० कोटी इतकी झाली आहे. सिनेमाचं बजेट हे १५ कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं बजेट वसूल करणंही सिनेमासाठी अवघड होणार आहे.
Loveyapa Box office collection Day 5: अरेरे! जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या ‘लव्हयाप्पा’ ची अशी अवस्था, पाच दिवसांत फक्त इतकीच कमाई
‘लव्हयाप्पा’ सिनेमाला बजेट वसूल करणंही अवघड जाणार आहे. तर दुसरीकडे ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सनम तेरी कसम सिनेमानं सहा दिवसांत तब्बल २० कोटींच्या वर कमाई केली आहे.
तर आता येत्या १४ फेब्रुवारी रोजी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगचीही चर्चा सुरू आहे.अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सिनेमानं पाच कोटींच्यावर कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. विकी कौशलच्या करिअरमधला सगळ्यात जास्त ओपनिंग देणारा हा सिनेमा ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळं आता ‘लव्हयाप्पा’ सिनेमाचं थिएटरमध्ये टिकणं अवघड होणार आहे.