Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख 70306 46046
स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये सॅलेसबरी पार्क, पुणे येथे एका चारचाकी इसमास दोन अनोळखी इसमांनी अडवुन त्याच्याबरोबर वाद करुन त्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेतली म्हणुन स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस उप निरीक्षक, संतोष तानवडे, पोलीस अंमलदार. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे यांच्या आदेशाने स्वारगेट पोलीस ठाणे हददीत रवाना झालो असताना पोलीस अंमलदार सुजय पवार यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हे डायसप्लॉट चौक गुलटेकडी पुणे येथे थांबले आहेत. अशी माहीती मिळाली असता आम्ही लागलिच सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता दोन संशयीत इसम आम्हास पाहुन पळुन जावु लागले असता त्यांना सदर पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ते १) रोहीत सुर्यकांत कांबळे वय २१ वर्ष रा. गल्ली नं. १ औदयोगिक वसाहत, व्हेईकल डेपो पुणे २) सागर शिवानंद जळकुटे वय २४ वर्ष रा. गल्ली नं. १ औदयोगिक वसाहत, व्हेईकल डेपो, पुणे असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, दि. ०६/०२/२०२५ रोजी श्रीसुविधा दर्शन बंगल्याजवळ, सॅलेसबरी पार्क समोर, पुणे येथे आमच्या गाडीच्या अपघातावरुन एका चार चाकी चालकाशी वाद झाला व आम्ही त्यांच्या गळातील चेन हिसकावुन घेऊन आलो आहे असे सांगितले व सदर इसम दाखल गुन्हयातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या कडुन दाखल गुन्हात चोरीस गेलेला मुददेमाल व गुन्हात वापरलेली दुचाकी असा एकुण १,००,०००/- रु. कि.चा मुद्देमाल पंचनामाने जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविण कुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परि.०२ पुणे अतिरिक्त कार्यभार, श्री विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक संतोष तानावडे, रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार नितीन वाघेला, सुजय पवार, संदिप घुले, दिपक खेदाड, फिरोज शेख, शैलेश वाघमोडे, हनुमंत दुधे यांनी केली.