Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बॉक्स ऑफिसवर गरजली 'छावा'ची डरकाळी! प्रेक्षकांच्या मनातलं राजांबद्दल प्रेम आलं दिसून, चौथ्या दिवसाची कमाई किती?
Chhaava Box Office Collection Day 4 : विकी कौशल रश्मिका मंदाना स्टारर छावा सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत बक्कळ कमाई केली.

१४ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या विकी कौशल-रश्मिका मंदान्ना यांच्या ऐतिहासिक कालखंडातील ‘छावा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३३.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३९.३० कोटी रुपयांची कमाई करून प्रेक्षकांची मने जिंकली. रविवारी ‘छावा’ ची क्रेझ आणखी वाढलेली पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४९.०३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. जरी हा सिनेमा एकाच दिवशी ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकला नसला, तरी तीन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यात तो यशस्वी झाला आहे. पहिल्याच आठवड्यात ‘छावा’ने भारतात एकूण १२१.४३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
TV तून कमावायची बक्कळ पैसा, बिग बॉसनंतर अचानक सोडला अभिनय; आता १३,००,००,००० रुपयांच्या बिझनेसची मालकीण
‘छावा’ १५० कोटींच्या जवळपास
‘छवा’ची खरी परीक्षा पहिल्या सोमवारी झाली, ज्यामध्ये तो उत्तीर्ण झाली. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ने भारतात पहिल्या सोमवारी २४ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे सुरुवातीच्या अंदाजानुसार एकूण १४५.४३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मंगळवारी तो सहजपणे १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, बुधवारी, म्हणजेच रिलीजच्या ५ व्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) पुन्हा एकदा विक्रमी कमाई होऊ शकते. जर हा अंदाज खरा ठरला तर ‘छावा’ ५ दिवसांत भारतात २०० कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल.
पहिल्या बायकोचा रहस्यमय मृत्यू, सलमान खानमुळे केलं दुसरं लग्न अन् फसला दिग्दर्शक, तिचा फोटो अजूनही पाकिटात
छावाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस चौथा
‘छावा’ने चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडले. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ने रणवीर सिंहच्या सिम्बा (२०१८), पीके, धूम ३ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. पहिल्या सोमवारी सिम्बाने २१.२४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला, पीकेने २१.२२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि धूम ३ ने २०.९१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
‘छावा’ जागतिक कलेक्शन
सॅकॅनिल्कच्या मते, ‘छावा’ हा चित्रपट पहिल्या आठवड्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर १६४.७५ कोटी रुपयांची कमाई करून वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने ३ दिवसांत परदेशात २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिसवर गरजली ‘छावा’ची डरकाळी! प्रेक्षकांच्या मनातलं राजांबद्दल प्रेम आलं दिसून, चौथ्या दिवसाची कमाई किती?
‘छावा’ चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे वीरपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मुघल शासक औरंगजेबापासून मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे.