Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhaava Box Office Collection: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने रिलीजच्या आठवड्यातच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट तुफानी वेगाने कमाई करत आहे आणि सात दिवसांत बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त व्यवसाय केला आहे.
‘छावा’ चित्रपटाने रिलीजच्या ७ व्या दिवशी किती कमाई केली?
‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट भरपूर कमाई करत आहे. ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची कथा आणि विकी कौशलच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता ‘छावा’ने थिएटरमध्ये सात दिवसांचा प्रवास पूर्ण केला असून यासोबतच २०० कोटींचा टप्पाही ओलांडला आहे. ‘छावा’ हा २०२५ मधला पहिला २०० कोटीं कमावणारा चित्रपट बनला आहे. या सगळ्यामध्ये, जर आपण चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास…
तुरुंगात जाताना संजय दत्तला प्रेग्नंट बायकोची चिंता, शेवटी या अभिनेत्रीवर सोपवली जबाबदारी, ९ महिने दिली सोबत अन् मग…
सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’चा पहिल्या दिवसाचे कलेक्शन ३१ कोटी होते.
दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ३७ कोटी रुपये कमावले
‘छावा’ने तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटींची कमाई केली.
‘छावा’ने चौथ्या दिवशी २४ कोटींची कमाई केली
पाचव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन २५.२५ कोटी रुपये होते.
‘छावा’ने सहाव्या दिवशी ३२ कोटी रुपये कमावले.
आता चित्रपटाच्या रिलीजच्या ७ व्या दिवशी म्हणजेच पहिल्या गुरुवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
अनन्याचा नो मेकअप लुक, पण पायातल्या चपलांची किंमत म्हणजे सर्वसामान्यांचा दोन महिन्यांचा पगार! किती रुपये माहितीये?
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ने सातव्या दिवशी २२ कोटींचा गल्ला जमवला आहे.
यासह, ‘छावा’ची ७ दिवसांत एकूण कमाई आता २१९.७५ कोटी रुपये झाली आहे. ‘छावा’ ने सातव्या दिवशी जवान, दंगल आणि स्त्री २ चा विक्रम मोडला.
‘छावा’ चित्रपटाने रिलीजच्या ७ व्या दिवशी पुन्हा एकदा दमदार कमाई केली आहे, ज्याने ‘जवान, दंगल’ आणि ‘स्त्री २’ सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. यासह, हा चित्रपट २२ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह ७ व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ८ वा चित्रपट बनला आहे. सॅकॅनिल्कच्या माहितीनुसार, ‘छावा’ ने ज्या चित्रपटांचा ७ व्या दिवसाचा कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे त्यापैकी ‘जवान’ने सातव्या दिवशी २१.३ कोटी रुपये कमावले. दंगलचा सातव्या दिवसाचे कलेक्शन १९.८९ कोटी रुपये होते. चेन्नई एक्सप्रेसने सातव्या दिवशी १९.६ कोटी रुपये कमावले. स्त्री २ चा ७ व्या दिवसाचा कलेक्शन १९.५ कोटी रुपये होते.
७ दिवसांत ‘छावा’ बनला ८ वा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा; दंगल, स्त्री २ चे मोडले रेकॉर्ड
‘छावा’चे लक्ष्य आता २५० कोटी क्लब आहे.
१३० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘छावा’ चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. निर्मात्यांना आशा आहे की ‘छवा’ची कमाई आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा वाढेल आणि तो २५० कोटी रुपयांचा आकडा सहज ओलांडू शकेल. यासह, हा चित्रपट विकी कौशलच्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या संपुर्ण कलेक्शनचा (२४५.३६ कोटी) विक्रम मोडेल. अभिनेत्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनू शकतो.