Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ind vs Pak सामन्याचा 'छावा'ला फटका, रविवार असूनही बॉक्स ऑफिसवर मोठं नुकसान, कमाई फक्त…

12

Chhaava Movie Box Office Collection : ‘छावा’ चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर १० दिवसांतच बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनला मोठे नुकसान झाले आहे

हायलाइट्स:

  • विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
  • लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाने १० दिवसांत भरपूर कमाई केली
  • रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा चित्रपटावर प्रभाव पडला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कथेवर आधारित या सिनेमाने सर्वसामान्यांना खूप आकर्षित केले आहे. यापूर्वी छत्रपती शंभूराजांबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती पण आता ही कथा लोकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस उलटले असून सिनेमाने प्रचंड नफा कमावला आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत मोठी कमाई केली आहे. पण रविवारी चित्रपटाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. खरंतर, रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप नुकसान झाले, अन्यथा रविवारी त्याने सर्वाधिक कमाई केली असती असे बोलले जातेय. यामुळेच शनिवारच्या तुलनेत दहाव्या दिवशी, रविवारी चित्रपट मागे पडला. असे असूनही, चित्रपटाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली प्राजक्ता माळी- ‘मुलगी, नवरा, संसार इतकं सगळं….’
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने दहाव्या दिवशी किती कमाई केली?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने ९ व्या दिवशी ४४.०० कोटी रुपये कमावले होते. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, विकी कौशलच्या या चित्रपटाने रविवारी ४०.०० कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात ३२६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘छावा’ने जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत ९ दिवसांत ३९३.३५ कोटी रुपये कमावले आहेत. १० दिवसांत हे कलेक्शन सुमारे ४४० कोटी रुपयांवर पोहोचले. ऑक्युपन्सीबद्दल बोलायचे झाले तर, रविवारी रात्रीच्या शोमध्ये ते सर्वाधिक होते. पुणे आणि मुंबईत सर्वाधिक गर्दी दिसून आली. मुंबईत सर्वात कमी ७४.००% आणि पुण्यात सर्वाधिक ८५.७५% प्रेक्षकांची गर्दी होती.

सुभेदारांच्या घरात प्रियाची नाटकं, सायलीवर खोटा आळ पण प्रसंगावधान आलं कामी, अर्जुनच्या नाटकाला फसले जोशी अन् महिपत!
‘छावा’ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतरची कथा आहे.

‘छावा’ ची कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट औरंगजेबाच्या उदयाबद्दल आहे, ज्याला हे माहित नव्हते की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज अजूनही दख्खनमध्ये त्याला कठीण काळ दाखवण्यासाठी जिवंत आहेत. जेव्हा संभाजी महाराज मुघल सैन्यासमोर आपले सामर्थ्य दाखवतात तेव्हा प्रत्येक पाहणारा थक्क होतो. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने आपले प्राण ओतल्याचे स्पष्ट दिसते. या भूमिकेसाठी त्याने केलेले कष्ट आजही प्रेक्षकांना भावतात.

Ind vs Pak सामन्याचा ‘छावा’ला फटका, रविवार असूनही बॉक्स ऑफिसवर मोठं नुकसान, कमाई फक्त…

छावामधील कलाकार

विकी कौशल व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम, प्रदीप रावत, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.