Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 27 फेब्रुवारी 2025: मूलांक 1 प्रोजेक्टमध्ये यश ! मूलांक 9 जे ठरवणार, तेच होणार ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 27 February 2025 : गुरुवारी मूलांक 1 प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मूलांक 4 साठी संयम महत्त्वाचा असून वादविवाद टाळा. मूलांक 8 च्या जातकांना कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळणार तर मूलांक 9 चे लोक जे ठरवतील तेच होणार. चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – प्रोजेक्टमध्ये यश, कौतुक होणार

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असून ऑफिसच्या कामात उत्तम यश आहे. ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहेत ते यशस्वी होईल त्यामुळे तुमचे खूप कौतुक होणार आहे. एखाद्या जुन्या प्रकरणात किंवा वादावर तोडगा मिळू शकेल. कुटुंबात थोडं तणावाचं किंवा नाराजीचं वातावरण असेल. नातेसंबंधात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वाने प्रत्येक काम करा, यश तुमचेच असेल.
मूलांक 2 – आव्हानांचा सामना होणार

आज तुम्हाला तुमच्या योजना पूर्ण करताना काही आव्हाने येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर त्यावर मात कराल. कामांमध्ये सतर्कता आणि योग्य नियोजनाची गरज असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी पूर्ण माहिती मिळवा. कुटुंबात काही तणाव असेल पण तो तात्पुरता आहे आणि वेळेनुसार तो दूर होईल.
मूलांक 3 – ऑफिसच्या कामात उत्तम यश

आजचा दिवस तुमच्यासाठी संधींनी भरलेला असून ऑफिसच्या कामात उत्तम यश आहे. तुमच्या विचारांना साकार करण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या क्रिएटीव्हीटीचा विचार करा. कुटुंबातील जीवनात आनंदाचा वातावरण असेल आणि घरात शांतता राहील. एखाद्या जुन्या तणावावर तोडगा सापडेल, ज्यामुळे तुमची मानसिक शांतता वाढेल.
मूलांक 4 – संयमाने काम करा, वादविवाद टाळा

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. ऑफिसच्या कामात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही मेहनतीने त्यांना दूर कराल. कुटुंबात थोडा ताणतणाव असेल पण तो तात्पुरता आहे. संयमाने काम करा आणि कोणत्याही वादापासून दूर राहा. आर्थिक स्थिती ठिक असेल.
मूलांक 5 – निर्णय विचारपूर्वक घ्या

आज मेहनतीचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमचे कौतुक होवून मान सन्मान वाढणार आहे. एखाद्या जुन्या प्रकरणावर तुमच्या बाजूने निकाल लागेल. जीवनात आनंद आहे फक्त प्रियजनांना वेळ देणे गरजेचे आहे. नातेसंबंधात समतोल ठेवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
मूलांक 6 – समस्येवर उपाय सापडेल

आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक शांततेचा आहे. दरम्यान जे काही काम कराल त्यात सखोल विचार करून निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात यशाचे संकेत पण तुम्हाला थोडं धैर्य ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या जुन्या तणावावर समाधान मिळेल. कुटुंबात सामंजस्य आणि सहकार्याचा वातावरण असेल, पण काही लहान समस्यांचा सामना करावा लागू शकतो, काळजी करु नका सगळं काही ठिक होणार आहे.
मूलांक 7 – स्वतःला रिचार्ज करा

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात यश आहे फक्त एखाद्या जुन्या मुद्द्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मानसिकदृष्ट्या थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे तुम्हाला स्वतःला रिचार्ज करण्याची गरज आहे. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात, पण ते लवकरच सुटतील. शांतपणे निर्णय घ्या. अपशब्द बोलू नका.
मूलांक 8 – कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळणार

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकते, त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आर्थिक दृष्ट्या वेळ उत्तम आहे. गुंतवणुकीचा विचार कराल पण पूर्ण योजना नीट समजून घ्या. कुटुंबात सुख समाधान आहे. नातेसंबंधात समतोल गरजेचा आहे. लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलावं लागेल.
मूलांक 9 – वादविवादापासून दूर राहा

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम करणार आहे. कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल
आहेत. कोणत्याही नवीन प्रोजेक्टबद्दल सतर्क राहा. कुटुंबात समतोल राखणं गरजेचं आहे. तुमच्यात भरपूर आत्मविश्वास आहे त्याचा फायदा होईल. कोणत्याही वादात हस्तक्षेप करु नका. जे काही ठरवाल ते होणारच आहे.