Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Todays Horoscope 3 March 2025 | आजचे राशीभविष्य 3 March 2025: या सप्ताहात तुमच्यासाठी काय फायदेशीर असणार ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य | Maharashtra Times
daily Prediction, 3 March 2025 : 3 मार्च कर्क वृषभ, मेष,तुळ,धनु, सिंह या राशींसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा आहे. मेष राशीचा खर्च वाढेल तर कर्क राशीची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या बाबतीत आजच्या दिवशी काय घडणार याची उत्सुकता असेल तर चला पाहूया मेष ते मीन राशीसाठी हा सप्ताह कसा असेल.
मेष – खर्च वाढू शकतो

आजच्या दिवशी नवीन घरगुती वस्तूंची खरेदी कराल त्यामुळे कुटुंबातील सदस्यही आनंदी राहतील. सासरच्या व्यक्तीसोबत पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कौटुंबिक खर्चात अचानक वाढ झाल्यामुळे तुम्हाला मानसिक ताण आणि दबाव जाणवेल त्यामुळे तुम्ही चिंतेत रहाल.आज तुमचे काही शत्रू तुमच्या व्यवसायात तुमच्याविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल.आज नशीब ९४% तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीरीचा नैवैद्य दाखवा.
वृषभ – गुंतवणूक करताना सावध रहा

तुम्ही आज कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा, अन्यथा तुम्हाला त्यात तोटा तसेच धोका देखील पत्करावा लागू शकतो. आज जुन्या मित्राला भेटल्यास बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.अन्यथा तो तुमच्यावर रागावू शकतो. नवीन वाहन खरेदी करणार असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.आज नशीब ६३% तुमच्या बाजूने असेल. तुमच्या गुरू किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या.
मिथुन – कुटुंबाला पार्टी द्याल

प्रेमात असणाऱ्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. अशाने नात्यातील त्यांचा आदरही वाढेल. परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच ते यश मिळवू शकतील.आज काही कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी आयोजित करू शकता. आज तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही योजनांमध्ये गुंतवणूक केली तर त्या योजना तुम्हाला भविष्यात खूप फायदे देतील.आज नशीब ६५% तुमच्या बाजूने राहील. गणपतीला लाडू अर्पण करा.
कर्क – प्रतिष्ठा वाढेल

नोकरदार लोकांच्या पद आणि प्रतिष्ठा वाढवण्याचा आजचा दिवस असेल. आज तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचा कामात रस वाढेल. आज तुम्हाला मुलांकडून देखील आनंदी बातम्या ऐकायला मिळतील ज्यामुळे तुम्ही खुश असाल. कुटुंबात अनेक दिवसांपासून कलह चालू असेल तर तो आज संपुष्टात येऊ शकतो. आज कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील. आज नशीब ७२% तुमच्या बाजूने असेल. शिव चालिसा पठण करा.
सिंह – उत्साही असाल

आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीपासूनच उत्साही वाटेल. यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे अगदी उत्साहात आणि जोशात पूर्ण कराल.आज तुम्ही तुमचे थोडेफार पैसे इतरांसाठी खर्च कराल. मात्र ज्यांच्यावर पैसे खर्च कराल ते तुम्हाला चुकीचे समजणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदारीत कोणताही व्यवसाय केला असेल तर आज त्याचा तुम्हाला नफा मिळू शकतो. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. आज नशीब ७५% तुमच्या बाजूने राहील. देवी सरस्वतीची पूजा करा.
कन्या – अनावश्यक खर्च होऊ शकतो

आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. आज तुमच्या खाण्याच्या सवयींवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला एखादा जुना आजार असेल तर त्याचा त्रास वाढू शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आज तुमच्या कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आज तुम्ही अनावश्यक खर्च देखील करू शकता. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित तुमचा काही वाद चालू असेल तर तोही आज सोडवला जाऊ शकतो.आज नशीब ८२% तुमच्या बाजूने असेल. पांढऱ्या वस्तू दान करा.
तुळ – खर्चामध्ये समतोल राखावा

राजकारणात काम करणाऱ्यांच्या कामाचं आज कौतुक होईल आणि त्यांना जनतेचा पाठिंबाही मिळेल. आज तुम्हाला सरकारी कार्यात पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे दिसते. आज तुम्हाला तुमची मिळकत आणि खर्चामध्ये समतोल राखावा लागेल.असे न केल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. आज तुमच्या आईला एखादा आजार होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा.आज नशीब ६२% तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवैद्य अर्पण करा.
वृश्चिक – रखडलेली कामे पूर्ण होतील

आज तुमची योग्यता वाढवून तुम्ही नोकरीच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्याकडून टोमणे ऐकावे लागू शकतात त्यामुळे तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात अचानक बाहेरगावी जावे लागेल. काही प्रलंबित कामे आज पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज संध्याकाळी एखाद्या काही धार्मिक कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता.आज नशीब ६३% तुमच्या बाजूने असेल. पहिली भाकरी गाईला खायला द्या.
धनु – उधार देऊ नका

कुटुंबातील सदस्यांसंदर्भात आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. असे न केल्यास भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. आज जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर थांबा तुमचे परत मिळण्याची गॅरेंटी नाही पैसे अडकू शकतात. प्रेमात असणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद-विवाद चालू असतील तर तेही आज संपुष्टात येतील.आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.
मकर – नवीन व्यवसायासाठी दिवस उत्तम

विद्यार्थी आज भविष्यासाठी प्लॅनिंग करून अभ्यास करतील यामुळे ते परीक्षेत यश मिळवू शकतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कामात अडचणींना सामोरे जावे लागेल मात्र धैर्याने त्यावर मात करण्यात यश मिळेल.नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही संध्याकाळ तुमच्या भावांसोबत महत्वाच्या विषयावर बोलण्यात घालवाल.आज नशीब ७६% तुमच्या बाजूने राहील. गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा.
Priyanka Londhe – 1600×900 (3)

मीन – अनपेक्षित नफा होईल

नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळेल. नोकरीत ईच्छेनुसार परिणाम मिळाल्याने आनंदी असाल. आज तुम्ही संध्याकाळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारताना घालवाल मुले सुद्धा आनंदी असतील.आज जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावर वाद होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा वाद वाढू शकतो. व्यवसायात काही नवीन गोष्टी सुरू केल्या असतील तर त्या तुम्हाला अपेक्षित नफा देतील.आज नशीब ८९% तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि दिवा लावा.