Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Career Horoscope 4 March 2025 : Aaj Che Aarthik Rashi Bhavishya 4 March 2025 : आर्थिक बाबतीत १२ राशींसाठी, मंगळवार, कसा असेल? | Maharashtra Times
Finance Horoscope Today 4 March 2025 In Marathi : मंगळवार असून गणरायाचा आशीर्वाद सगळ्या राशीच्या लोकांवर असेल. तुमच्या कामातील विघ्न दूर होतील. मेष राशीची कामे पटापट मार्गी लागतील त्यासाठी टीमवर्कने काम करा. कर्कसाठी अचानक धनलाभा योग आहे. वृश्चिक राशीने व्यवसायात तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. मकर राशीने कोणालाही आर्थिक मदत करताना शंभरवेळा विचार करावा. मीन राशीच्या जातकांचे ऑफिसमध्ये कौतुक होणार आहे. तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : टीमवर्कने सोडवा समस्या

आजचा दिवस ठिक असून तुमच्या जवळच्या आणि इतर लोकांच्या भावना ओळखा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. काहीवेळा इतरांच्या मनाप्रमाणे वागल्यामुळे मानसिक समाधान मिळते. कधी कधी दुसऱ्यांचे ऐकण्यात काहीच वाईट नसते. दुकान किंवाऑफिसमध्ये टीमवर्कद्वारेच तुम्ही कोणत्याही समस्येचे निराकरण करु शकता.
वृषभ आर्थिक राशिभविष्य: भरपूर खरेदी करणार आहात.

आजचा दिवस खरेदीचा आहे असे म्हणावे लागेल. आवश्यक कपडे, स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य तुम्ही खरेदी करणार आहात. घरातील ज्येष्ठ मंडळींसोबत वाद घालू नका. ते जसं म्हणतील तसं वागा, तुमचे काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. व्यवसायात नवीन संधी येतील.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : भागिदारीतील व्यवसायात उत्तम लाभ

तुमचा मान- सन्मान वाढेल तसेच घरात देखील सगळेजण तुमचा आदर करतील. भागिदारीत व्यवसाय असेल तर चांगला लाभ होईल तसेच सगळ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे तुमची कामे पटापट मार्गी लागतील. तुमच्या डोक्यावरील कर्ज काही प्रमाणात कमी होणार आहे.
कर्क आर्थिक राशिभविष्य : अचानक धनलाभाची शक्यता

आज दिवस उत्तम असून अचानक धनलाभ होईल. ऑफिसमध्ये काही बदल होतील ते सकारात्मक असतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम यश आहे. कामे वाढत आहेत पण योग्य नियोजन गरजेचं आहे. रात्री कुटुंबासोबत एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात.
सिंह आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये अधिकार वाढणार

ऑफिस किंवा व्यवसायात तुम्हाला नवीन अधिकार मिळतील. तुम्ही क्रिएटीव्ह कामात अधिक रुची घेणार असून त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मुलांच्या विवाहाची चर्चा सुरु असेल तर त्यात वेग येवून विवाह जुळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण बचतीकडे दुर्लक्ष करु नये.
कन्या आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये अचानक बदल होणार

आज तुमचा वेळ मित्रांशी वाद-विवाद करण्यात व्यर्थ होण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होतो आहे त्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. तुमच्या आसपास सकारात्मक वातावरण निर्माण होईल याकडे लक्ष द्या. ऑफिसमध्ये अचानक काही बदल होतील ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. काळजी करु नका, तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील.
तुळ आर्थिक राशिभविष्य : नवीन कामात सखोल विचार करुन निर्णय घ्या

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असून काही प्रतीष्ठीत लोकांसोबत तुमची भेट होणार आहे, याचा फायदा भविष्यात होईल. नवीन कामांमध्ये कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर गंभीरपणे विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. घरातील काही कामे जी प्रलंबीत आहे ती आज तातडीने मार्गी लावाल. आज थोडे व्यस्त असणार आहात पण तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात तज्ज्ञाचा सल्ला घ्या

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आहे. व्यवसाय किंवा व्यापाराच्या बाबतीत तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल. ऑफिसमध्ये तुमची जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे पार पाडणार आहात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मस्त व्यतीत होईल.
धनु आर्थिक राशिभविष्य : घरगुती वस्तूंची खरेदी करणार

आजचा दिवस संमिश्र असून जुन्या कर्जांपासून तुम्ही मुक्त व्हाल. ऑफिसच्या कामात तुम्ही दिलेल्या सुचनांचे पालन केले जाईल. काही आवश्यक घरगुती वस्तूंची खरेदी करणार आहात. आज शॉपिंग करताना तुमच्या पाकिटावर खास लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम आहे पण पैसे वायफळ खर्च करु नका.
मकर आर्थिक राशिभविष्य : आर्थिक मदत करणे शक्यतो टाळावे

आज तुम्ही केलेला प्रवास तुम्हाला खूप लाभ देणार आहे. भावंडांसोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. काही जुनी कामे मार्गी लागल्यामुळे किंवा अडकलेले पैसे पटकन मिळाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कोणी उधार पैसे मागितले तर अजिबात देवू नका. कामात योग्य नियोजन करा तुम्हाला लाभ होईल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : राजकीय क्षेत्रात उत्तम यश

कुंभ राशीचे जे लोक राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना चांगले यश मिळेल. तुमच्या सुचना किंवा रणनीती यांचा आदर राखला जाईल. स्पर्धा परिक्षा दिली असेल तर उत्तम यश मिळेल. समाजामध्ये चांगल्या कामासाठी खर्च करणार आहात. तुमची मिळकत आणि खर्च याची जोडणी व्यवस्थीतपणे करा.
मीन आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये तुमच्या विचारांचे कौतुक

आज तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. तुमचे सहकारी कामात मदत करतील आणि ऑफिसमध्ये तुमच्या विचारांचे कौतुक होईल. घरातील प्रत्येक सहकारी तुम्हाला मदत करणार आहे. संध्याकाळी काही तणाव राहील पण काळजी करु नका ते सगळी कामे व्यवस्थित पार पडली की तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आई-वडिल आणि गुरुंच्या प्रती कायम मनात आदर ठेवा.