Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Todays Horoscope 4 March 2025 | आजचे राशीभविष्य 4 March 2025: मेष राशी होणार मालामाल तर कन्या राशीला येणार विवाह प्रस्ताव … तुमच्या राशीत काय आहे जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य | Maharashtra Times
Today Horoscope 4 March 2025 In Marathi : 4 मार्च मीन, वृश्चिक, सिंह कन्या,मेष या राशींसाठी हा आठवडा चांगले परिणाम देणारा आहे. मेष राशी मालामाल होताना दिसणार तर वृषभ राशी आपल्या सुख सोयींवर पैसे खर्च करणार . तुमच्या बाबतीत आजच्या दिवशी काय घडणार याची उत्सुकता असेल तर चला पाहूया मेष ते मीन राशीसाठी हा सप्ताह कसा असेल.
मेष – मालमत्ता व्यवहारात मालामाल व्हाल

स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील व त्यांना उत्तम नफा मिळेल. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला नवीन संधीही मिळतील. आईची तब्बेत अचानक बिघडल्याने तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थोडी समस्या जाणवेल. आज नशीब ९३% तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
वृषभ – सुखसोयींवर पैसे खर्च कराल

कुटुंबातील विवाहयोग्य व्यक्तीच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. आज तुम्ही तुमच्या सुखसोयींवर पैसे खर्च कराल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराच्या सहकार्याची आणि सहवासाची गरज भासेल.आज संध्याकाळी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातून आनंद मिळेल. आज नशीब ९८% तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.
मिथुन – समोरच्याला सल्ला देताना विचार करा

बुद्धीचातुर्याने व्यवसायात घेतलेला कोणताही निर्णय आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला गरज असताना कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून मदत न मिळाल्याने तुमचा त्यांच्यावरचा विश्वास उडेल. समोरच्याला सल्ला देण्यापूर्वी काळजी घ्या की त्याला तुमच्या बोलण्याचे वाईट वाटणार नाही. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांकडून सहकार्य मिळेल.आज नशीब ६५% तुमच्या बाजूने राहील. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
कर्क – भावंडांची कामात मदत घ्याल

आज तुम्हाला पैशाच्या कमतरतेमुळे व्यवसायात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्ही तुमच्या भावाकडूनही मदत मागू शकता. तुमच्या घरातील आणि व्यवसायातील शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील परंतु ते यशस्वी होऊ शकणार नाहीत.आज तुम्ही तुमच्या व्यवसायिक कामात व्यस्त असल्याने कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही.आज नशीब ९७% तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणाला दान द्या.
सिंह – कामात व्यस्त असाल

आज तुमच्या मध्ये परोपकाराची भावना वाढू लागेल. नोकरीत कामाच्या दबावामुळे आज तुम्ही व्यस्त राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढू शकणार नाही त्यामुळे तो तुमच्यावर रागावू शकतो. जर काही बिझनेस प्लॅन्स दीर्घ काळापासून प्रलंबित असतील तर तुम्ही त्यावर काम करुन आज सुरु करु शकता ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल.आज तुम्ही संध्याकाळचा वेळ धार्मिक विधींमध्ये घालवाल.आज नशीब ६२% तुमच्या बाजूने असेल.तुमच्या गुरू किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या.
कन्या – विवाह प्रस्ताव येतील

आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या घरात जर कौटुंबिक वाद सुरू असतील तर तेही आज संपुष्टात येतील. आज विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येतील ज्याला कुटुंबातील सदस्य मंजूरी देऊ शकतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल थोडे चिंतेत असाल.आज नशीब ६६% तुमच्या बाजूने असेल. शिव चालिसा पठण करा.
तुळ – जुन्या मित्रांच्या भेटी होतील

शिक्षणात आज रुची वाढेल आणि तुम्हाला तुमच्या नवीन कामांमधून शिकायला मिळेल. नोकरी करणारे जर पार्ट टाईम काम करण्याचा विचार करत असतील तर आज त्यांना त्यासाठीही वेळ मिळेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल. खूप दिवसांपासून जुन्या मित्राला भेटण्याचा विचार करत असाल तर ती भेज आज घडून येईल. आज तुमच्या प्रेम जीवनात एक नवीन ऊर्जा असल्याने तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम आणखी घट्ट होईल.आज नशीब ७१% तुमच्या बाजूने राहील. पिवळ्या वस्तू दान करा.
वृश्चिक – शत्रूंचा संयमाने सामना करावा

आज तुमची व्यवसायातून मिळकत कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज तुमच्या मुलाची उत्कृष्ट प्रगती पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शत्रूंचा संयमाने सामना करावा लागेल अन्यथा ते तुमचे काम बिघडू शकतात. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळेल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना आज नवीन संधी मिळतील.आज नशीब ६८% तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा द्यावा.
धनु – व्यवसायात भागीदार दगा करु शकतो

आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे काम पूर्ण करण्यात तुम्ही व्यस्त असाल. तुमच्या जोडीदाराकडून आज तुमच्यासाठी पार्टीचे आयोजन केले जाऊ शकते. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारावर आज बारीक नजर ठेवावी लागेल अन्यथा तो तुमचा विश्वासघात करू शकतो.आज नशीब ८२% तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी मिसळून अर्पण करा.
मकर – फुकटचा सल्ला देऊ नये

आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्याने आनंद होईल. कोणालाही न मागता सल्ला देऊ नका अन्यथा अडचणीत याल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याशी निगडीत कोणताही निर्णय घेत असाल तर त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्यांच्या सल्ला घ्यावा लागेल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन लोकांची सेवा कराल.आज नशीब ७३% तुमच्या बाजूने राहील. पिठाचे गोळे माशांना खायला द्यावे.
कुंभ – उधारी देऊ नका

नवीन नोकरीत रुजू झाला असाल तर आज तुमच्यासाठी दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकला जाऊ शकता. एखाद्याला उधार देण्याचा किंवा काही घेण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज तुमच्या चिडचिड स्वभावामुळे तुमचे कुटुंबीय निराश राहील.आज नशीब ९५% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुजींची पूजा करावी.
मीन – आरोग्याची काळजी घ्या

आईकडून आज तुम्हाला प्रेम आणि आदर मिळत असल्याचे दिसते. आज विद्यार्थ्यांची त्यांच्या शिक्षकांप्रती पूर्ण निष्ठा आणि समर्पण असल्याने त्यांचे शिक्षक त्यांच्यावर आनंदी राहतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे काही शत्रू तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. तुमचा कोणाशी आज वाद झाला तर कठोर बोलणे टाळावे.आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावे लागेल.आज नशीब ८५% तुमच्या बाजूने असेल. हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.