Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
करिअरमधील बदल फायदेशीर, प्रोजेक्टमध्ये भागिदारी लाभदायक ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य | Maharashtra Times
Numerology Prediction, 6 March 2025
: गुरुवार हा भगवान विष्णु यांना समर्पीत असून त्यांची कृपादृष्टी सर्व मूलांकावर राहणार आहे. मूलांक 1 आणि मूलांक 5 चे मन दुखावले जाणार तर मूलांक 3 असणाऱ्यांनी वादविवादापासून दूर राहावे. मूलांक 8 चे जातक शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांना उत्तम यश मिळेल. मूलांक 9 साठी दिवस चांगला असून काम मिळणार आहे तसेच आर्थिक स्थिती उत्तम असे
मूलांक 1: मन दुखावले जाणार

आज तुम्ही जास्त भावनिक होणार आहात. आज तुम्हाला कोणीतरी असं काही बोलेले ज्यामुळे तुम्ही उदास व्हाल. तुमचे मन दुखावले जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज कठोर मेहनत करावी लागेल. कामामध्ये सहकारी मदत करतील. व्यवसायात आर्थिक लाभ असून गुंतवणुकिचा विचार करु शकता.
मूलांक 2: कामे पूर्ण करताना वेळ लागेल

आज काही पूर्ण करताना वेळ लागू शकतो. जे तुमचे आहे ते तुम्हालाच मिळणार आहे पण जे नाही त्याचा अती विचार केला तर तुम्हालाच त्रास होईल. मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला थोडे टेन्शन असेल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळेल त्यामुळे तुमचा मुड चांगला होईल.
मूलांक 3: वादविवादापासून दूर राहा

आज मनात खूप सारे विचार येणार आहेत आणि काही विचारांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. दुसऱ्याच्या चुकांमुळे तुम्हाला जास्त त्रास सहन करावा लागेल. वादविवादापासून दूर राहा आणि समजा भांडण झाले तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. अपशब्दांचा वापर करू नका. रागात कोणताही निर्णय घेवू नका.
मूलांक 4: जलद गतीने कामे मार्गी लावणार

आज तुम्ही खूप वेगात कामे पूर्ण करणार आहात. मुलांच्या बाबतीत काही गोष्टींमुळे वाद होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ मंडळी तुमच्यावर दबाव टाकणार आहेत. आज काही जण तुमच्याकडे दुर्लक्ष करतील पण तुम्ही निराशा होवू नका. सकारात्मक राहा कारण येणारा काळ तुमचाच असेल. त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मेहनतीचा मार्ग निवडा.
मूलांक 5: कोणीतरी तुमचे मन दुखावणार

आजचा दिवस तुमच्यासाठी ठिक नाही, तुम्ही जे काही ठरवल आहे ते पूर्ण होण्याची शक्यता नाही. कोणाशी व्यर्थ वाद होऊ शकतो किंवा कोणीतरी तुमचे मन दुखावणार आहे. सकारात्मक विचार करणे सोडू नका. काही कामात संभ्रम होवू शकतो तेव्हा कामे करताना सतर्क राहा. ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्ही नक्की मार्ग काढाल.
मूलांक 6: पार्टीचा मूड आहे, कामे वेगात पूर्ण करणार

आज दिवस मस्त असून तुम्ही पार्टी मूडमध्ये असाल. कामे पूर्ण करण्यात वेग दाखवा अन्यथा तुमची कामे बाकी राहतील. मित्रांसोबत फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. भावंडांसोबत चांगला वेळ व्यतीत करणार आहात त्यामुळे मानसिक समाधान मिळेल.
मूलांक 7: मदत घ्यावी लागेल, तरच काम पूर्ण होणार

तुम्हाला कुठेतरी जाण्याची अचानक संधी मिळेल आणि त्याचा लाभ घ्या. आज काही कामे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. तुम्हाला आज कामे मार्गी लागवण्यासाठी मदत घ्यावी लागेल. तरच तुमचे काम वेळेत पूर्ण होईळ. आज खरेदी करणार आहात पण जे आवश्यक आहे तेच खरेदी करा. व्यर्थ खर्च करणे टाळावे.
मूलांक 8: शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांना उत्तम यश

तुमचे काम पूर्ण होताना थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करणार आहात. प्रॉपर्टीशी संबंधित काही काम असेल तर आज ते मार्गी लागेल. आज अचानक धन प्राप्ती होवू शकते. घराता वातावरण आनंदाचे असेल. मानसिक समाधान मिळेल.
मूलांक 9: काम मिळणार तसेच आर्थिक स्थिती उत्तम

तुमच्यासाठी दिवस चांगला असून काम मिळण्याची शक्यता आहे आणि आर्थिक समस्या देखील यामुळे सुटणार आहे. अचानक धनलाभाचा योग आहे. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते त्वरित मिळतील. व्यवसाय थोडा मंद गतीने सुरु आहे पण काळजी करु नका लवकरच वेग पकडणार आहात. मानसिक समाधान मिळेल फक्त तुम्ही सकारात्मक राहा.