Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Chhaava Box Office Collection : २२ व्या दिवशीही थिएटरमध्ये छावाची डरकाळी, विकी कौशलच्या सिनेमाने ऑस्कर विजेत्या 'RRR' लाही टाकलं मागे

31

Chhaava Box Office : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने २२ दिवसांत ४९०.७९ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात अंदाजे ६६८ कोटींची कमाई केली आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट ५०० कोटी रुपयांची कमाई करण्याच्या अगदी जवळ आहे

हायलाइट्स:

  • विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २२ दिवस उलटले.
  • २२ व्या दिवशी कलेक्शन बाबतीत ‘RRR’ ला मागे टाकले आहे.
  • ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ आणि ‘क्रेझी’ च्या कमाईवर परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊन २२ दिवस उलटले आहे. या चित्रपटाच्या बंपर कमाईने अनेक सिनेमांना मागे टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सर्वांचे मन जिंकत आहे. पण या सिनेमाने नव्याने रिलीज झालेल्या सिनेमांना मागे टाकले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट २२ दिवसांत थिएटरमध्ये हिट झाला आहे. शुक्रवारी ‘छावा’च्या कमाईत मोठी वाढ झाली. ‘छावा’च्या २२ व्या दिवसाच्या कलेक्शनने देशातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे, त्या सिनेमाने तिसऱ्या शुक्रवारी फक्त ४.५ कोटी रुपये कमावले होते.

सर्वसामान्यांसाठी Good News! आता सिंगल स्क्रीन असो वा मल्टीप्लेक्स चित्रपट पाहा फक्त २०० रुपयांत, पण महाराष्ट्रात नाही…
आता ‘छावा’ ५०० कोटींच्या अगदी जवळ

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने २२ व्या दिवशी ७.२४ कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच, या चित्रपटाने ४९०.७९ कोटी रुपयांची कमाई केली. याचा अर्थ हा चित्रपट आता ५०० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आता ‘छावा’ सनी देओलच्या ‘गदर २’ ला कधी मागे टाकेल हे याची उत्सुकता सिनेप्रेमींना आहे.

Zindagi Na Milegi Dobara च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, पुन्हा एकत्र दिसणार ऋतिक, फरहान अख्‍तर आणि अभय देओल
‘छावा’ ने जगभरात किती कमाई केली?

‘छावा’ जगभरात खूप लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने जगभरात ६६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. जर फक्त परदेशातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तर सिनेमाने ८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Chhaava Box Office Collection : २२ व्या दिवशीही थिएटरमध्ये छावाची डरकाळी, विकी कौशलच्या सिनेमाने ऑस्कर विजेत्या ‘RRR’ लाही टाकलं मागे

सिनेमाच्या कास्टबद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. याशिवाय अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारलीय. छावा सिनेमात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, मनोज कोल्हाटकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांसारख्या मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.