Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या धामधूमीतही झुकला नाही 'छावा', २४ व्या दिवशीही हाऊसफुल, विकीचे सलमानला आव्हान

55

Chhaava Movie Box Office: काल भारताने न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पण तरीही छावा सिनेमाचा जोर काही कमी झालेला नाही. रविवारी २४ व्या दिवशीही सिनेमाने बक्कळ कमाई केल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाबद्दल रिलीजच्या आधीच बऱ्याच काळापासून चर्चा होती. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हा चित्रपट चांगला चालेल अशी अपेक्षा होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी धमाल करेल असे कोणालाही वाटले नव्हते.

मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या कथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाचे कौतुक केले होते. चित्रपटप्रेमींपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनीच या कथेचे कौतुक केले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवर थेट दिसून येतो. कोणत्याही चित्रपटाचे यश त्याच्या कलेक्शनवरून मोजले जाते. जर चित्रपटाने मोठे रेकॉर्ड मोडले तर त्याला ब्लॉकबस्टर म्हटले जाते.

गोविंदाचे बॉलिवूडवर खळबळजनक आरोप, कट कारस्थान अन् विश्वासघाताचा खुलासा, म्हणाले- घराबाहेर बंदूक घेऊन…
छावा चित्रपटाने २४ व्या दिवशी किती कमाई केली?

विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २२५.२५ कोटी रुपये कमावले होते. यानंतर, दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १८६.१८ कोटी रुपये कमावले. तर, तिसऱ्या आठवड्यात एकूण कलेक्शनमध्ये ८४.९४ कोटी रुपये झाल्याचे बोलले जाते. या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात प्रवेश करताना ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, २४ व्या दिवशी छावाने ९.२ कोटी रुपये जमा केले आहेत. तथापि, या आकडेवारीत थोडा बदल होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, विक्की-रश्मिकाच्या चित्रपटाने चौथ्या दिवशीही चांगली कामगिरी केली आहे. शनिवारी या चित्रपटाने १६.७५ कोटी रुपये कमावले होते. येत्या काळात तो इतर कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. याशिवाय काल भारत विरुद्ध न्यूझीलॅंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना झाला तरी सिनेमाच्या कमाईत कोणतीही कमतरता दिसून आली नाही.

IND vs NZ Champions Trophy Final : चॅम्पियन्स ट्रॉफी १२ वर्षांनी पुन्हा एकदा भारतात! बॉलिवूडकरांनीही दाखवला जल्लोष, कोणी कसं सेलिब्रेट केलं पाहाच…
चित्रपटातील स्टारकास्टच्या कामाचे कौतुक

‘छावा’ चित्रपटातील विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा, विनित कुमार सिंह यांसारख्या कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. विशेषतः या चित्रपटाद्वारे, विकी आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट झाला. विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

Chhaava Box Office Collection: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या धामधूमीतही झुकला नाही ‘छावा’, २४ व्या दिवशीही हाऊसफुल, विकीचे सलमानला आव्हान

सिकंदरसाठी ठरेल का आव्हान?

सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’ २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. भाईजानचा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला चालेल असे मानले जाते पण थिएटरमध्ये आल्यानंतर, सिकंदरची थेट स्पर्धा छावाशी होईल ज्याने आधीच तिकीट खिडकीवर चांगली पकड निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत सलमान आणि विकीपैकी कोणाला प्रेक्षकांकडून जास्त प्रेम मिळते हे पाहणे रंजक ठरेल.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.