Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य 10 मार्च 2025 : कर्क राशीला होणार गुंतवणुकीचा फायदा ! वृश्चिक राशीला मिळणार वडिलोपार्जित मालमत्ता ! पाहा, तुमचे राशिभविष्य

34

वृश्चिक राशीला मिळणार वडिलोपार्जित मालमत्ता तर कर्क राशीला होणार गुंतवणुकीचा फायदा तसेच मेष राशीची नोकरीत प्रतिभा वाढणार मग बघा तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आजचे राशिभविष्य : Today’s Horoscope 10 मार्च 2025 In Marathi : 10 मार्च 2025 रोजी तुमच्या राशीवर करिअर,कौटुंबिक जीवन,आर्थिक तसेच सामाजिक बाबतीत कसा प्रभाव पडेल.तुमची राशी काय सांगते?आजच्या दिवसात काय होणार? भविष्यात सतर्क होण्यासाठी कोणते उपाय करावे लागणार पहा मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य

मेष – नोकरीत प्रतिभा वाढेल

आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगली राहील. आज विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल त्यामुळे त्यांचे मन अभ्यासात केंद्रित होईल. कुटुंबात काही कलह चालू असेल तर तो आज संपेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.आज तुमच्या नोकरीतही तुमची प्रतिभा आणि शौर्य पाहून तुमचे शत्रू पराभूत होतील. परंतु आज तुम्ही काही समस्यांमुळे व्यर्थच त्रस्त व्हाल. आज तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल.आज नशीब ६०% तुमच्या बाजूने असेल. गरिबांना कपडे आणि अन्न दान करा.

वृषभ – कामात व्यस्त रहाल

आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असल्याने आज तुम्हाला तुमच्या दिवसाचा अधिक वेळ इतरांसाठी काम करण्यात घालवावा लागणार नाही . आज तुम्ही इतरांच्या समस्या सोडवण्याआधी तुमच्या प्रियजनांकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज तुमचे मन तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे व्यथित होईल कारण आज तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी त्याची मदत होणार नाही. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. आज तुमच्या मुलाला सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला आनंद होईल.

मिथुन – जोडीदारासोबतचे वाद मिटतील

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार केला असेल तर त्यासाठी दिवस चांगला जाईल. तुम्ही आज कुठेतरी गुंतवणूक करत असाल तर तेही मनापासून करा, कारण त्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. जोडीदारासोबतचे वाद मिटतील. आज नशीब ७०% तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.

कर्क – गुंतवणुकीचा फायदा होईल

आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आदर मिळत असल्याचे दिसते. सामाजिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल, कारण केलेल्या कामाचा अपेक्षित लाभ न मिळाल्याने ते थोडे चिंतेत राहतील. आज तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते मनापासून करा, त्याचा फायदा होईल.आज तुम्ही घराला रंग देण्याचाही विचार करू शकता. संध्याकाळची वेळ काढून आज खरेदीला जाऊ शकता. आज नशीब ७९% तुमच्या बाजूने असेल. शिवजप माला पाठ करा.

सिंह – व्यवसाय उंचीवर जाईल

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे ते अभ्यासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यात यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने नवीन कल्पना व्यवसायात घेऊन याल ज्यामुळे तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर जाईल.आज तुम्हाला परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या प्रेम जीवनात बदल झाल्याने तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज संध्याकाळी तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो.आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. ‘संकटनाशक गणेश स्तोत्रचा’ रोज पाठ करा.

कन्या – प्रॉपर्टी खरेदी कराल

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुमच्या मुलाच्या विवाहाशी संबंधित समस्या दूर झाल्यामुळे आज तुम्ही आनंदी असाल. आज जर तुम्हाला नवीन घर, जमीन, वाहन इत्यादी घ्यायचे असेल तर त्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेम जीवनातील लोकांमध्ये खोटे बोलण्यावरून वाद होऊ शकतो. याकारणाने नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे खोटे बोलणे टाळावे लागेल. आज तुम्ही तुमच्या आईसोबत चांगला वेळ घालवाल ज्यामुळे ती आनंदी होईल.आज नशीब ८१% तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा.

तुळ – कौटुंबिक वादात तिसऱ्याचा हस्तक्षेप टाळा

आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सावध रहावे लागेल अन्यथा तुमच्या सुंदर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या सासरच्या कोणाशी काही वाद चालू असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊन तो संपवण्याचा प्रयत्न करावा लागेल.आज तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखावे लागेल अन्यथा तो कौटुंबिक वातावरण बिघडू शकतो. आज तुम्ही तुमच्या मुलाला नवीन व्यवसाय सुरु करून देण्याचा करण्याचा विचार करू शकता. आज नशीब ९२% तुमच्या बाजूने असेल. सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करावे.

वृश्चिक – वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल

आज तुम्हाला तोंडात साखर ठेवून अगदी गोड बोलून तुमच्या व्यवसायातील कामे समोरच्या व्यक्तीकडून करून घ्यावी लागतील तरच त्याचा फायदा होईल. आज जर एखाद्याच्या बोलण्याचे तुम्हाला वाईट वाटत असले तरी शांत राहणे आणि ते ऐकणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत आवडीचे काम सोपवले जाऊ शकते त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळाल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. आज तुमच्या जोडीदारासोबत वादामुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल.आज नशीब ६६% तुमच्या बाजूने असेल. श्री गणेश चालिसा पठण करा.

धनु – विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल कारण परीक्षेच्या निकालाने विद्यार्थी आज खुश होतील आणि त्यांचे कुटुंबही त्यांच्यासोबत आनंदी होईल. निकालातील यश पाहून त्यांच्यासाठी पार्टीही आयोजित केली जाऊ शकते. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमांसाठी काही लोकांना भेटू शकता. आज संध्याकाळी पूजा, हवन करू शकता. तुमचे शत्रू तुमच्या कामात अडचणी निर्माण करू शकतात त्यामुळे विचार आणि विवेकाने निर्णय घ्या.आज नशीब ७३% तुमच्या बाजूने राहील. गाईंना गूळ खाऊ घाला.

मकर – खर्चावर नियंत्रण ठेवा

आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चामुळे चिंतेत असाल आणि त्यावर नियंत्रण कसे करायचे हा विचार करत राहाल. मात्र आज तुम्हाला बचत करावी लागेल. नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. वाढत्या खर्चामुळे आज तुमचा स्वभावही चिडचिड होईल ज्यामुळे तुमचा आईशी वाद होऊ शकतो. असे झाले तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.आज नशीब ९६% तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ म्हणा.

कुंभ – व्यवसायात लाभ होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मिळणाऱ्या नफ्यामुळे तुम्ही आनंदी असाल. जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पैसे उधार देत असाल तर या बाबतीत तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. भाऊ-बहिणीमध्ये काही वाद सुरू असेल तर तो आज संपेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासह तुमच्या दैनंदिन गरजांसाठी काही खरेदी करू शकता. जर तुम्ही आज तुमच्या मुलाला फिरायला घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. आज नशीब ७१% तुमच्या बाजूने राहील. मुंग्याना पीठ घाला.

मीन – नोकरी सोडू नका

आज करिअरशी संबंधित काही चिंता असतील तर त्यावर मात करण्याचा प्रयत्न कराल मात्र थोडेसे अयशस्वी व्हाल. आज तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ती मिळणे कठीण आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या नोकरीला सोडण्याचा विचार लगेच करू नये. तुमच्या भविष्याचे प्लॅनिंग करण्यासाठी एखाद्या नातेवाईकाची मदत घेऊ शकता.आज कामाबाबत कोणालाच सल्ला देऊ नका अन्यथा भविष्यात ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. आज तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या असभ्य वर्तनामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल.आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.

प्रियांका लोंढे

लेखकाबद्दलप्रियांका लोंढेप्रियांका लोंढे प्रिंट,आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहे. विविध विषयांवर क्रिएटिव्ह लेख, स्क्रिप्ट लिहिण्याचा उत्तम अनुभव आहे. आध्यात्मिक, धार्मिक विषयांसोबतच कला, संस्कृती, सिनेमा, सोशल, राजकारण, क्राईम अशा विविध विषयांवर आधारित लेखन केले आहे. डिजिटल माध्यमासाठी स्क्रिप्ट लिहून व्हॉइसओवर दिले आहेत. ट्रॅव्हल करायला आवडत असल्याने अनेक ट्रॅव्हल स्टोरीज लिहिल्या आहेत.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.