Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhaava Movie Box Office Collection: छावा सिनेमा बॉक्स ऑफिस उत्तम कमाई करत असून पठाणचाही रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

Poonam Pandey: सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली पूनम पांडे, अश्लील कंटेट बनवण्याची का आली वेळ? त्यातून कमावते किती
‘छावा’ चित्रपटाने रिलीजच्या २५ व्या दिवशी किती कमाई केली?
‘छावा’ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या ऐतिहासिक सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांनीही या सिनेमात महाराणी येसूबाई आणि औरंगजेबाच्या महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या २५ दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे + रिलीज झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांतच त्याने आपले बजेट वसूल केले होते आणि त्यानंतर त्याने प्रचंड नफा कमावला आहे. सिनेमाने निर्मात्यांच्या तिजोरीत पैशांची भर टाकली आहे. अजूनही छावाची कमाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘छावा’ ने चौथ्या आठवड्याच्या शेवटीही भरपूर कमाई केली पण चौथ्या सोमवारी त्याच्या कमाईत लक्षणीय घट झालेली दिसली.
‘छावा’ने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपये कमावले
‘छावा’ने दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपये कमावले
तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ८४.०५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
२२ व्या दिवशी ‘छावा’ने ८.७५ कोटी आणि २३ व्या दिवशी १६.७५ कोटींची कमाई केली.
गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून बाळांना जन्म, जगप्रसिद्ध गायिकेने दाखवली डिलिव्हरी रूमची झलक
‘छावा’ने २४ व्या दिवशी १०.७५ कोटी रुपये कमावले होते.
आता चित्रपटाच्या रिलीजच्या २५ व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ने रिलीजच्या २५ व्या दिवशी म्हणजे चौथ्या सोमवारी ६.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
यासह, ‘छावा’ची २५ दिवसांत एकूण कमाई आता ५२६.०५ कोटी रुपये झाली आहे.
Chhaava Box Office Collection: रिलीजच्या २५ व्या दिवशी ‘छावा’वर पैशांचा पाऊस, पठाणचा रेकॉर्ड मोडायला हवे फक्त इतके कोटी
‘छावा’ आता शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या कलेक्शनला मागे टाकण्याच्या काहीच पावले दूर
‘छावा’ ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचून भरपूर पैसे कमवले आहेत. हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे अजूनही तो अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडत आहे. सध्या, हा चित्रपट शाहरुख खानच्या २०२३ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणचा विक्रम मोडण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे. सकनिल्कच्या मते, पठाणचे भारतात एकूण कलेक्शन ५४३.०९ कोटी रुपये होते. तर छावा ने २५ दिवसांत ५२६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशा परिस्थितीत, हा चित्रपट पठाणला मागे टाकण्यापासून फक्त १७ कोटी रुपये दूर आहे. चौथ्या आठवड्यात ‘छावा’ पठाणचा रेकॉर्ड मोडू शकेल की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.