Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shani Gochar 2025 : मार्चच्या अखेरीस शनिचा राशी बदल ! 5 राशींनी रहावे सतर्क, समस्यांचा सामना, करिअरमध्ये अडचण, व्यवसायात तोटा
Saturn Transit 2025 Pisces :शनि महाराज अष्ट अवस्थेत 29 मार्च रोजी मीन राशीत संक्रमण करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते, की अष्ट अवस्थेत शनिचा शुभ प्रभाव कमी होतो आणि अशुभ प्रभाव वाढतो. अशा स्थितीत, शनि आपली मूळ राशी कुंभ राशी सोडून गुरूच्या मीन राशीत जातात. यामुळे मेष आणि सिंह राशीसह अनेक राशींवर याचा घातक परिणाम दिसून येतो. शनिच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी, आजारपण यांचा सामना करावा लागतो. त्या राशी कोणत्या आहेत ज्यांना तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. ते जाणून घेवूया तसेच त्यासंदर्भातील उपाय देखील पाहूया.
शनि संक्रमणाचा मेष राशीवर प्रभाव: परदेशवारी पण खर्च वाढणार

शनि मेष राशीसाठी 12 व्या स्थानात संक्रमण करणार आहेत. ज्यामुळे तुमच्यावर शनिच्या साडेसातीचा प्रभाव सुरू होईल. याचा संमिश्र परिणाम पहायला मिळणार आहे. परदेशाच प्रवासाची संधी आहे पण खर्च वाढू शकतात, त्यामुळे सावध राहा. डोळे आणि पाय या संदर्भात आजार डोके वर काढतील. तब्येतीची काळजी घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा मल्टीनॅशनल कंपनीसोबत काम करत असाल तर फायदा होणार.जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत शनि वक्री असणार आहे त्यामुळे तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्येक शनिवार श्री बजरंग बाणचे पठण करा.
शनि संक्रमणाचा सिंह राशीवर प्रभाव: तब्येतीची काळजी घ्या, अचानक खर्चात वाढ

सिंह राशीसाठी शनि 8 व्या स्थानात संक्रमण करणार आहे. यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. अगदी सामान्य कारणाने तब्येत खराब झाली तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्ज फेडण्यात यश येणार. कायदेशीर बाबींमध्ये फायदा आहे पण अचानक खर्च वाढणार आहेत. सासरच्या मंडळींसोबत संवाद वाढेल. नोकरीत चढ-उतार आहेत पण तुम्ही शांततेने आणि मेहनतीने काम केलं तर यश मिळेल. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान कामकाजात चढ-उतार आणि तब्येतीच्या समस्या आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्येक शनिवार नील शनि स्तोत्राचे पठण करा.
शनि संक्रमणाचा मकर राशीवर प्रभाव: परदेशवारी होणार, कुटुंबात एकत्र राहा

मकर राशीसाठी शनि तिसऱ्या स्थानात संक्रमण करणार आहे. ज्यामुळे तुमच्यावर संमिश्र प्रभाव पडेल. छोटे छोटे प्रवास आणि परदेशवारीची संधी आहे. रिलोकेशन होवू शकतं, तयार राहा. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढणार आहे. भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहा. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पचनशक्तीची समस्या होतील तसेच आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. मिळकतीमध्ये वाढ हवी असेल तर जास्त कष्ट करावे लागतील. कुटुंबात कलह होऊ शकतो आणि बचत करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. उपाय म्हणून प्रत्येक शनिवार शनि चालीसाचे पठण करा.
शनि संक्रमणाचा धनु राशीवर प्रभाव: कुटुंबात कलह, रिलोकेशन करणार

धनु राशीसाठी शनि चौथ्या स्थानात संक्रमण करत आहेत. ज्यामुळे शनीची ढैय्या सुरू होईल. जेव्हा असे होते तेव्हा कुटुंबासोबत काही काळासाठी दूरावा येऊ शकतो, काम किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. कुटुंबात वादविवादाची शक्यता आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कायदेशीर बाबींमध्ये यश तसेच मेहनतीचे फळ मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जीवनशैलीत थोडा बदल करा, फायदा होईल. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान छातीशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून प्रत्येक शनिवार काळ्या तिळाचे दान करा.
शनि संक्रमणाचा मीन राशीवर प्रभाव: ताणतणाव, आजारपण वाढणार

शनि मीन राशीतच संक्रमण करणार आहेत त्यामुळे तुमच्यावर याचा मोठा प्रभाव पडेल. भावंडांसोबत प्रेम वाढेल पण वैवाहिक जीवनात उतार-चढाव येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या तसेत नात्यात तणाव येऊ शकतो. व्यावसायिक संबंधांसाठी ही वेळ उत्तम आहे. नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील. व्यावसायिक योजना तयार करा आणि त्याचा वापर करा. नोकरी करणाऱ्यांना शहाणपणाने काम करण्याची गरज आहे. तसेच कठोर मेहनत आहे, त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान मानसिक तणाव, शारीरिक समस्यां आणि वैवाहिक जीवनातील उतार-चढाव वाढणार आहेत. उपाय म्हणून प्रत्येक शनिवारी छाया दान करा.