Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट

12

Ram Gopal Verma Statement: राम गोपाल वर्मा यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एकदा एका वादग्रस्त ट्विट प्रकरणात पोलिस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. पण नंतर असे काहीतरी घडले की अधिकारी एकत्र बसले, दारू प्यायले आणि निघून गेले.

हायलाइट्स:

  • राम गोपाल वर्मांनी ४-५ वर्षे जुनी गोष्ट सांगितली
  • वादग्रस्त ट्विट प्रकरणात राम गोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते पोलिस अधिकारी
  • पोलिसांनी सोबत केले मद्यपान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हल्ली चित्रपटांपेक्षा त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे जास्त चर्चेत असतात. ट्विटरवर (आता X) ते अनेकदा अशा गोष्टी पोस्ट करतात ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. ‘रंगीला’, ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ सारखे सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राम गोपाल वर्मा यांनी आता एका मुलाखतीत एक नवीन आणि खळबळजनक दावा केला आहे. दिग्दर्शकाने सांगितले की, वादग्रस्त ट्विट्सच्या संदर्भात पोलिस एकदा त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत दारू प्यायली आणि मग निघून गेले. राम गोपाल वर्मा यांनी ‘गेम चेंजर्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘४-५ वर्षांपूर्वी मी काही ट्विट केले होते. मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही, मला जे वाटले ते मी लिहून टाकले. काही तासांनंतर, महेश भट्ट सरांनी मला फोन केला आणि म्हणाले, रामू, तुझ्या ट्विटवरून गोंधळ उडाला आहे, पण हे समजून घे की ईशनिंदा करणे कायद्याच्या विरोधात नाही. खरे सांगायचे तर, ते कशाबद्दल बोलत आहेत हे मला कळाले नाही कारण मी काय केले होते ते मी विसरून गेलो होतो.

या अभिनेत्रीला हवी होती ४/५ मुलं, पण नवरा नव्हता तयार, मग वयाच्या ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय
राम गोपाल वर्मा यांनी त्या दिवशी काय घडले ते सांगितले

दिग्दर्शकाने पुढे सांगितले की, या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सुमारे ६-७ गुन्हे दाखल आहेत. ‘आम्ही सर्व ६-७ प्रकरणे एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोपर्यंत पोलीस माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले.’ दरम्यान, न्यायालयाने तो कायदा रद्द केला होता. आता पोलिसांना काय करावे हे समजत नव्हते, म्हणून ते सर्व माझ्यासोबत बसले, दारू प्यायले आणि मग निघून गेले.

आवाज चांगला ठेवायला स्पर्मचे कॉकटेल पिते ही गायिका! रेसिपी ऐकून अंगावर येईल काटा
‘ मी कधीकधी लोकांना चिडवण्यासाठी ट्विट करतो’

हैदराबादचे रहिवासी असलेले राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत कबूल केले की ते त्यांच्या बहुतेक ट्विटकडे फारसे लक्ष देत नाहीत. ‘मी जे काही ट्विट करतो ते बहुतेक अज्ञानामुळे असते. पण कधीकधी मी हे एखाद्याला चिडवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी देखील करतो.’

अटक करायला आलेले पोलीस, दारु पिऊन पार्टी करुन गेले! बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट

राम गोपाल वर्मा म्हणाले – मी कमेंट वाचत नाही

राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी सोशल मीडियावर ट्रोलिंगबद्दल म्हटले होते की ते या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. ‘मी एकदा काहीतरी पोस्ट केले की, लोक त्याबद्दल काय म्हणत आहेत हे पाहण्यासाठी मी क्वचितच ते तपासतो. मी कधीच कमेंट वाचल्या नाहीत. मला जे काही म्हणायचे आहे ते मी सांगितले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.