Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सलमान खानच्या 'सिकंदर'ची कमाई घसरली; भाईजानची जादू तिसऱ्या दिवशीच पडली फिकी!

14

Sikandar Box Office Collection Day 3: सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सिकंदर’ चित्रपटाने तीन दिवसामध्ये बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली?

हायलाइट्स:

  • तिसऱ्या दिवशी कमी झाली ‘सिकंदर’ची कमाई
  • सलमान खानच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
  • ३० मार्च रोजी रीलिज झाला आहे चित्रपट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणारा ‘सिकंदर’ हा सिनेमा ३० मार्च रोजी जगभरात रीलिज झाला. दीर्घकाळ मोठ्या हिटच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सलमानला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ओपनिंग डेला सिनेमाने चांगली कमाई केली, शिवाय दुसऱ्या दिवशी ईद असल्याने तेव्हाही तगडी कमाई झाली. मात्र तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये काहीशी घसरण झाली आहे. असे असले तरी एआर मुरुगदास यांच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाची ३ दिवसांची भारतातील कमाई १०० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. जाणून घ्या आतापर्यंत किती झाले बॉक्स ऑफिस कलेक्शन? सलमान-रश्मिकासह या चित्रपटात प्रतीक स्मिता पाटील, सत्यराज, शर्मन जोशी आणि काजल अग्रवाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या कमाईत ११.५४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे ईदच्या दिवशीची कमाई २९ कोटींवर पोहोचली. तिसऱ्या दिवशी मात्र या कमाईत घसरण होऊन मंगळवारी १९.५ कोटींचे कलेक्शन झाले आहे. एकूण ३ दिवसात या चित्रपटाने ७४.५ कोटी रुपये कमावले.

Nikki Tamboli पुन्हा एकदा मराठी शोमध्ये राडा घालण्यासाठी सज्ज! अभिनेत्रीची स्टार प्रवाहवर एन्ट्री
तिसऱ्या दिवशी ‘सिकंदर’च्या कमाईत घसरण झाली असली तरी हा सिनेमा सिंगल स्क्रिनवर हाऊसफुल होतो आहे. चाहते सोशल मीडियावर सलमान खानवरचे त्यांचे प्रेम व्यक्त करतायंत आणि भाईजानचा सिनेमा पाहून आनंदी होत आहेत. समीक्षकांकडून या चित्रपटावर टीका करण्यात आली, तरीही चाहते सलमान खानच्या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सलमानचा हा सिनेमा पुढील १-२ दिवसात १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करेल असा अंदाज वर्तवला जातो आहे.

ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाले आहे, मात्र गेल्या वर्षी ईदला त्याचा कोणताही सिनेमा रीलिज झाला नव्हता. त्यावेळी अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणचा ‘मैदान’ रीलिज झाला. चाहत्यांनी या दोन्ही चित्रपटांना म्हणाला तसा प्रतिसाद दिला नाही, परिणामी या चित्रपटांनी अनुक्रमे ६० कोटी आणि ५१ कोटींची कमाई केली. ईदनिमित्ताने सलमानच्या सिनेमाची चाहत्यांना प्रतिक्षा होती. सिनेमाला मिळालेले रीव्ह्यू चांगले नसले तरी ‘सिकंदर’ने ७० कोटींचा टप्पा पार केला आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.