Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘छावा’ सिनेमा चांगला चालत असून ४९व्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया.
‘छावा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
५ आठवड्यांच्या अधिकृत आकडेवारीनुसार आणि ६ व्या आठवड्याच्या सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, छावाने ४२ दिवसांत ६०२.११ कोटी रुपये कमावले. ४३ व्या, ४४ व्या आणि ४५ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ₹ १.१५, ₹ २ आणि ₹ १.१५ कोटींची कमाई केली. ४६ व्या, ४७ व्या आणि ४८ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ०.९, ०.५५ आणि ०.४ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे, चित्रपटाने गेल्या ४८ दिवसांत ६०८.२६ कोटी रुपये कमावले आहेत.
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चीच डरकाळी; अल्लू अर्जुनवर विकी कौशल पडला भारी, मोडला ‘पुष्पा २’चा रेकॉर्ड
छावाच्या कालच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सकाळी १०:४० वाजेपर्यंत चित्रपटाने ०.४० कोटींची कमाई केली आहे आणि एकूण कमाई ६०८.६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन
छावा पुष्पा २ चा विक्रम मोडू शकेल का?
पुष्पा २ ने ४९ व्या दिवशी हिंदीतून ३८ लाख रुपये कमावले होते. ‘छावा’ आता हेही मागे टाकत आहे. तसंच, ४९ व्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘गदर २’ च्या ०.०५ कोटी, ‘जवान’ च्या ०.१७ कोटी आणि ‘पठाण’ च्या ०.३ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे.‘एखाद्या महिलेला नग्न दाखवलं तर…’ सिनेमातील अश्लील सीन्सबद्दल स्पष्टच बोललेल्या स्मिता पाटील
दरम्यान, विकी कौशलने ‘छावा’मध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, डायना पेंटी, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंग यांच्याशिवाय आशुतोष राणा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून या सिनेमाचं बजेट १३० कोटी रुपये आहे.