Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत ‘छावा’ने एकामागून एक मोठे विक्रम मोडले आहेत. आज या चित्रपटाने सिकंदरसमोर ८ मोठे रेकॉर्ड मोडले आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने ७ आठवड्यात हिंदीतून ५९४ कोटी कमावले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हिंदी भाषेत चार आठवड्यांनंतर प्रदर्शित झालेल्या तेलुग भाषिक सिनेमाने तीन आठवड्यात १५.८७ कोटींची कमाई केली. म्हणजेच ७ आठवड्यात चित्रपटाची एकूण कमाई ६०९.८७ कोटी रुपयांवर पोहोचली. ५० व्या दिवशी चित्रपटाची कमाई ५५ लाख होती, तर आज म्हणजेच ५१ व्या दिवशी सकाळी १०:३५ वाजेपर्यंत ही कमाई ९० लाखांपर्यंत वाढली आहे. आतापर्यंत एकूण कमाई ६११.३२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सॅकनिल्कवर उपलब्ध असलेले हे आकडे सध्या अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; ८ ब्लॉकबस्टर सिनेमांना पछाडलं, ‘सिकंदर’लाही चारली धूळ
शाहरुखच्या ‘जवान’ने ५१ व्या दिवशी फक्त ५ लाख आणि पठाणने २५ लाख कमावले. त्याचप्रमाणे, अॅनिमलने १३ लाख रुपये आणि स्ट्री २ ने फक्त ५ लाख रुपये कमावले. अल्लू अर्जुनच्या मेगाब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’ ने ५१ व्या दिवशी हिंदी आवृत्तीतून फक्त १८ लाखांची कमाई केली. सनी देओलच्या गदर २ बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने ८ व्या आठवड्यात एकूण ५५ लाखांची कमाई केली आहे, जी छावाने आधीच मागे टाकली आहे.IPL स्टार क्रिकेटरच्या EX बायकोची होणार खतरों के खिलाडीमध्ये एण्ट्री, दुसरा नाव तर अगदीच शॉकिंग
याशिवाय, KGF चॅप्टर २ ची ८ व्या आठवड्यात सर्व भाषांमधील एकूण कमाई ८८ लाख रुपये झाली आणि कल्की २८९८ एडीने ५१ व्या दिवशी ६ लाख रुपये कमावले. म्हणजेच ‘छावा’ने ५१ व्या दिवशी ८ ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.