Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बॉक्स ऑफिसवर 'छावा'चीच हवा; विकी कौशलने रचला इतिहास, १० मोठे विक्रम काढले मोडीत

27

Chhaava Movie Box Office Collection : एकीकडे, सिकंदर बॉक्स ऑफिसवर रेंगाळत आहे, तर दुसरीकडे, विकी कौशलच्या चित्रपटाने ५२ व्या दिवशी १० मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘छावा’ चित्रपटगृहांमध्ये एकामागून एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांची शानदार घोडदौड पूर्ण केली आहे आणि आता पुन्हा एकदा नवीन विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाच्या रिलीजदरम्यान, छावाचे चाहते अजूनही चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत आणि त्यामुळेच हा चित्रपट अजूनही कमाई करत आहे. तर मग जाणून घेऊया ५२ व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली आणि चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने हिंदी आणि तेलुगूमध्ये ७ आठवड्यात ६०९.८७ कोटी रुपये कमावले आहेत. तेलुगू आवृत्तीची कमाई फक्त ३ आठवड्यांपासून आहे. कारण, ‘छावा’ हा चित्रपट हिंदी आवृत्तीच्या रिलीजच्या चार आठवड्यांनंतर तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला होता.
‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; ८ ब्लॉकबस्टर सिनेमांना पछाडलं, ‘सिकंदर’लाही चारली धूळ
५० व्या आणि ५१ व्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे ५५ लाख आणि ९० लाख रुपये कमावले. म्हणजेच चित्रपटाने ६११.३२ कोटी रुपये कमावले होते. आता जर आपण सिनेमाच्या ५२व्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर सकाळी १०:३५ वाजेपर्यंत चित्रपटाने १.३० लाखांची कमाई केली होती आणि चित्रपटाची एकूण कमाई ६१२.६२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चीच हवा; विकी कौशलने रचला इतिहास, १० मोठे विक्रम काढले मोडीत

छावाने १० मोठे विक्रम मोडीत काढले

‘छावा’ने रिलीजच्या ५२ व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांना मागे टाकलं आहे. यापैकी काही चित्रपटांची ८ व्या आठवड्यातील एकूण कमाई ‘छावा’च्या कालच्या कमाईपेक्षा कमी आहे. गदर २- ५५ लाख (एकूण ८ व्या आठवड्याची कमाई) RRR- ८० लाख (आठव्या आठवड्यात हिंदी आवृत्तीची संपूर्ण कमाई) ऍनिमल – २० लाख (५२ व्या दिवसाची कमाई) जवान – १३ लाख (५२ व्या दिवसाची कमाई) पुष्पा २- ४५ लाख (सर्व भाषांमधील ५२ व्या दिवसाची कमाई) स्त्री २- ९० लाख (५२ व्या दिवसाची कमाई) पठाण – २० लाख (५२ व्या दिवसाची कमाई) कल्की – ६ लाख (सर्व भाषांमधील ५२ व्या दिवसाची कमाई) बाहुबली २- १.४ कोटी.
जया बच्चन यांनी चाहत्यांना फटकारलं; महिलेला ढकललं अन्…, Video व्हायरल
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अक्षय खन्ना, डायना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.