Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kesari Chapter 2 ची पहिल्या दिवशी कमाई कमी, पण या १० बड्या चित्रपटांना टाकलं मागे, मोडला हा रेकॉर्ड

40

Kesari chapter 2 box office collection: अभिनेता अक्षय कुमार याच्या केसरी चॅप्टर २ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासूनच चर्चेत असलेला ‘केसरी चॅप्टर २’ नुकताच प्रदर्शित झाला.ओपनिंग कमी झाली असली तरी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सिनेमा २०२५ मध्ये झालेल्या १० चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.

‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटात अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जालियानवाला बाग हत्याकांडावर आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर लढ्यावर आधारित आहेत. कोर्टरुम ड्रामा असलेल्या या सिनेमाचं सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटानं पहिल्या दिवशी ७.५० कोटींची कमाई केली आहे. अद्याप अधिकृत आकडे येणं बाकी आहे.

कमाई कमी, पण…
‘केसरी चॅप्टर २’ ची होत असलेली चर्चा पाहता हा सिनेमा पहिल्या दिवळई आठ ते दहा कोटींची कमाई करू शकतो, असं म्हटलं जात होतं. मात्र सिनेमानं अपेक्षेपेक्षा कमी कमाई केल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी सिनेमानं एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. छावा, सिकंदर, स्काय फोर्स आणि जाटनंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट ठरला आहे.
शाहरुखच्या लेकीचा थाट, १.८७ लाखांचा ड्रेस अन् बॅगेची किंमत तर गगनाला भिडणारी, इतक्या महागड्या वस्तू वापरते सुहाना

इतकंच नाही तर ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटानं २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या इतक मोठ्या बॅनरच्या चित्रपटाना मात दिली आहे.

‘आलेच मी’ गाण्यावर ठसकेबाज लावणी , अमृता खानविलकरचा सईला फुल्ल सपोर्ट; पण नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स
या सिनेमांना ‘केसरी चॅप्टर २’नं टाकलं मागे

  • देवा-5.78 कोटी
  • द डिप्लोमट-4.03 कोटी
  • बॅडएस रवी कुमार – 3.52 कोटी
  • इमर्जन्सी-3.11 कोटी
  • फतेह -2.61 कोटी
  • मेरे हसबंड की बीवी- 1.75 कोटी
  • आझाद-1.50 कोटी
  • लव्हयापा-1.25 कोटी
  • क्रेझी-1.10 कोटी
  • सुपरबॉयज ऑफ मालेगांव-0.50 कोटी

बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता
पहिल्या दिवशी चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमारच्या तसंच अनन्याच्या अभिनयाचं देखील प्रेक्षकांनी कौतुक केल आहे. त्यामुळं पहिल्या दिवशी कमाई म्हणावी कशी झाली नसवी तरी विकेंडला मात्र सिनेमाच्या कमाईत वाढ होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.