Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
600 Not Out! ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा; चित्रपटाच्या यशाबद्दल विकीच्या वडिलांची पोस्ट चर्चेत
Chhaava Movie : विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून या सिनेमाने ६०० कोटींचा गल्ला कमावला आहे. त्याबद्दल विकीच्या वडिलांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

600 Not Out! ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा; चित्रपटाच्या यशाबद्दल विकीच्या वडिलांची पोस्ट चर्चेत
शाम कौशल यांची पोस्ट
विकी कौशलचे वडील आणि सुप्रसिद्ध ऍक्शन डिरेक्टर शाम कौशल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. शाम यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘छावा’ सिनेमाचं पोस्टर दिसतंय. या फोटोवर, ‘६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर. ‘पुष्पा २ हिंदी’, ‘स्त्री २’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे’ असं लिहिलं असून या पोस्टखाली ‘छावा सिनेमाला एवढा चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. शाम कौशल यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने ६४ व्या दिवशी ०.०५ कोटी कमावले. यांसह, चित्रपटाने ६०१.१ कोटी रुपये कमावले आहेत. ‘छावा’ या चित्रपटाची ओपनिंग ३१ कोटी होती. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी, पाचव्या आठवड्यात ३३.३५ कोटी, सहाव्या आठवड्यात १६.३ कोटी, सातव्या आठवड्यात ६.५५ कोटी, आठव्या आठवड्यात ४.१ कोटी आणि नवव्या आठवड्यात १.२५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘मी प्रभू श्री रामांना नाही, दशरथ यांना फॉलो करतो ज्यांच्या ३ बायका होत्या..’ सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान, ‘जवान’ सिनेमाचं कलेक्शन ६४०.२५ कोटी रुपये होतं. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने ५८२.३१ कोटी रुपये, तमिळ आवृत्तीने ३०.०८ कोटी रुपये आणि तेलुगू आवृत्तीने २७.८६ कोटी रुपये कमावले. तर स्त्री २ ने बॉक्स ऑफिसवर ६२७.०२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘छावा’ सिनेमाने जगभरात ८०७.४० कोटी रुपये कमावले आहेत. हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.