Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सई ताम्हणकरच्या बॉलिवूड सिनेमाची पहिल्या दिवशी किती झाली कमाई? इमरान हाश्मीसह झळकली मुख्य भूमिकेत

26

Ground Zero Box Office Collection Day 1: सई ताम्हणकर आणि इमरान हाश्मी यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ग्राउंट झीरो’ या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले?

हायलाइट्स:

  • सई ताम्हणकरच्या बॉलिवूड सिनेमाची किती झालीये कमाई?
  • पहिल्या दिवशी निराशा
  • ‘ग्राउंड झीरो’ची ट्विटरवर मात्र चर्चा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

मुंबई: मराठमोळ्या सई ताम्हणकरचा Ground Zero हा बॉलिवूड सिनेमा 25 एप्रिल रोजी रीलीज झाला. या चित्रपटात सईसह इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. सईसह Lalit Prabhakar हा मराठी अभिनेताही या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत झळकत असून, ललितचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. या नव्या थ्रिलर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर म्हणावी तितकी चांगली सुरुवात झालेली नाही. ‘ग्राउंड झीरो’ने शुक्रवारी, म्हणजेच रीलिजच्या पहिल्या दिवशी साधारण दुपारपर्यंत 37 लाख रुपयांची कमाई केली. तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, तरी सुरुवातीच्या आकडेवारीनुसार बॉक्स ऑफिसवरील कामगिरी निराशाजनक आहे.

‘ग्राउंड झीरो’ चित्रपटाची एकूण हिंदी ऑक्युपन्सी फक्त 4.71% नोंदवली गेली, जी अपेक्षेपेक्षा कमी आहे. सॅकनिल्क वेबसाइटने दिलेल्या वृत्तासार, पहिल्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन निराशाजनक राहिले. सिनेमाची बहुतांश कमाई मुंबई, एनसीआर आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमधून झाली आहे. देशभरातील इतर ठिकाणी सिनेमासाठी कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. असे असले तरीही Sacnilk वर देण्यात आलेले पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुरुवातीच्या सत्रातील आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत यामध्ये आणखी बदल पाहायला मिळू शकेल.

दरम्यान या चित्रपटाची कमाई जरी आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी, एक्स या प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्सनी ‘ग्राउंड झिरो’चे कौतुक करणारे ट्वीट केले आहे.

निर्मात्याला मटण खाऊ घातले अन् भांडीही घासायला सांगितली! परेश रावल यांनी सांगितला नाना पाटेकरांचा धमाल किस्सा
‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ धर दुबे यांच्या सत्यकथेवर आधारित आहे, ज्यांनी 2001 दरम्यान गाजी बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी राणा ताहिर नदीम याला ठार मारण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. इमरान हाश्मी या अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारत असनू सई त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटात झोया हुसेन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ललित प्रभाकर, मुकेश तिवारी, दीपक परमेश, रॉकी रैना, राहुल वोहरा हे कलाकारदेखील या सिनेमात आहेत. ट्रेलर-टीजरमध्ये या सर्वांची झलक पाहायला मिळाली होती.

मराठमोळा दिग्दर्शक तेजस देऊस्करने ‘ग्राउंड झीरो’चे दिग्दर्शन केले आहे. २५ एप्रिल रोजीच तेजसचे ‘ग्राउंड झीरो’ आणि ‘देवमाणूस’ असे दोन मराठी चित्रपट रीलिज होणार आहेत.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.