Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(शैलेश चौधरी)
एरंडोल: तालुक्यातील खडके खुर्द!निपाणे,जानफळ,वैजनाथ, पिंप्री सिम या पाच महसूली गावांपैकी एकाही गावात स्वस्त धान्य दुकान नसल्याने या पाच ही गावांत नव्याने स्वस्त धान्य दुकानांचे जाहीरनामे दि.१२ ऑक्टोंबर२०२१ रोजी जाहीर करण्यात आलेले आहेत.
त्यासाठीचे अर्ज एरंडोल येथील पुरवठा विभागात उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत दि.२०नोव्हेंबर२०२१ पर्यंत आहे,अशी माहीती एरंडोल तहसिलदार सुचेता चव्हाण यांनी दिली.
यासाठी गावांतील ग्रामपंचायत,बचत गट,सहकारी संस्था आदींना अर्ज करता येणार आहे,अशी माहीती तहसिल प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.
यासाठी स्वयंसहाय्यता बचत गट नोंदणीकृत असल्याबाबत दस्तऐवज,रास्त भाव दुकान चालविण्यासाठी असलेल्या भांडवलाबाबतचे प्रमाणपञ,रास्त भाव धान्य दुकान परवाना संमती पञ,संस्थेचा ठराव,ताळेबंद,बँक-बँलन्स,पोटनियमाची प्रत,त्या गावातील व क्षेञातील संस्था असल्याबाबतचा पुरावा,स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्यांचे त्यांच्या कुटुंबातील कोणासही रास्त भाव धान्य दुकान मंजूर झाले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापञ,स्वयंसहायीत संस्था/गटाबाबत न्यायप्रविष्ठ बाब नसल्याबाबतचे दस्तऐवज,संस्था ही नोंदणीकृत व कार्यरत असल्याबाबतचे संस्थेच्या निबंधकांचे पञ, तसेच संस्थेच्या उपविधी मध्ये स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी विहीत तरतुदी असणे आवश्यक राहील.नसल्यास तशी तरतुद नमूद करून संस्थेची उपविधी सादर करावी असे आवाहन एरंडोल तहसिलदार सुचेता चव्हाण यांनी केले आहे.