Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एरंडोल :- शैलेश चौधरी
पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्या संदर्भाने आयोजित बैठकीत ११ पैकी २ मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्तांची ही भूमिका पूर्वग्रहदुषित असल्याचा आरोप करीत संघटनेने १५ जून २०२१ मंगळवार पासून विविध टप्प्यांवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने ११मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले होते. त्यावर चर्चेकरीता पशुसंवर्धन आयुक्तांकडून निमंत्रण आवश्यक होते. परंतू आयुक्तांकडून या निवेदनाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली न गेल्याने संघटनेच्या पदाधिकार्यांनी सोमवारी ७ जून २०२१ रोजी पशुसंवर्धन आयुक्तांची भेट त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी देखिल ११ पैकी २ मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आल्याने संबंधित कार्यलयाची ही भूमिका पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेच्या विरोधी आणी पूर्वग्रहदुषित असल्याचा आरोप संघटनेने या पार्श्वभुमीवर केला आहे. ‘कोरोना,च्या पार्श्वभुमीवर आंदोलनाच्या माध्यमातुन पशुपालकांना वेठीस न धरता चर्चेतून या समस्यांचे निराकरण व्हावे अशी अपेक्षा संघटनेला होती. परंतू प्रशासनाने मागण्यांची कोणतीच दखल न घेतल्याने अतीरीक्त संघटनेने १५ जून २०२१ मंगळवार पासून विविध टप्प्यांत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मंगळवार पासून लसीकरण,सर्व प्रकारचे ऑनलाइन, मासिक तसेच वार्षिक अहवाल देणे बंद व त्यासोबतच आढावा बैठकांना देखिल संवर्गातील सदस्य उपस्थित राहणार नाहीत. २५जून शुक्रवार पासून राज्यातील विधानसभा,विधान परीषद सदस्य यांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येईल. त्यानंतर ३र्या टप्प्यात १६जुलै२०२१ पासून कायद्याप्रमाणे कामे केली जातील सोबतच सर्व शासकीय व्हॉट्सअप गृपमधून बाहेर पडण्याचा निर्णय देखिल संवर्गातील सदस्यांनी घेतला आहे.
प्रशासनाकडून या नंतरही मागण्यांची दखल घेतली न गेल्यास ‘काम बंद आंदोलना,चा इशारा पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे.
या आशयाचे निवेदन
एरंडोल तालुकाध्यक्ष डॉ.पी.आर.पाटील,उपाध्यक्ष डॉ. राहुल साळुंखे,सरचिटणीस डॉ.सुभाष सोनवणे,डॉ. आर. डी.चिंचोरे,डॉ. हेमंत नागणे व
श्रीमती पल्लवी सपकाळे यांनी गट विकास अधिकारी एरंडोल यांना दिले.