Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ओळखीचा फायदा घेत पोलिस उपनिरीक्षकाने काढली मुलीची छेड ! मग संतप्त जमावाने पब्लिक मार देवुन केली परतफेड..!

44

(शैलेश चौधरी)

धरणगाव: येथील पोलिस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या एका पोलिस उप निरीक्षकाने भरदिवसा विकृतपणाचा कळस गाठून पोलिस खात्याला काळीमा लावणारे दुष्कृत्य केल्याची घटना ३०नोव्हेंबर२०२१ रोजी दुपारी घडली.
चार दिवसांपूर्वीच फरकांडे येथील कापूस व्यापार्याचा रस्तालुटीत झालेल्या खूना प्रकरणी एका पोलिस कर्मचार्याला झालेल्या अटकेमुळे आधीच पोलिस खाते बदनाम झाले आहे.
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे,सर्वसामान्य जनतेमधून होणारे अत्याचार जितके माणुसकीला काळीमा फासणारे आहेत त्याहून अमानुषपणे व विकृतीचा कळस गाठणारी ही घटना आहे.
ज्यांचेवर सुरक्षेची जबाबदारी आहे.त्याच पोलिस खात्याच्या एखाद्या विकृत अधिकाऱ्याकडून जेव्हा ओळखीचा गैरफायदा घेऊन एखाद्या मुलीची छेड काढली जात असेल,जनतेचा रक्षकच भक्षक बनत असेल तर जनतेनं विस्वास ठेवावा तरी नेमका कुणावर..? असा प्रश्न जनसामान्यांना पडतो .
धरणगावच्या या घटनेने शहरात असुरक्षिततेचे व भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
आजकाल सगळीकडे मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतित प्रत्येक पालक चिंतीत असतात.
स्वाभाविक त्या अनुषंगाने येथील एका पालकाने या पोलिस उप निरीक्षकाशी आपली ओळख असल्याने व आपली मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने तिची कुणी छेड काढू नये,तिला कुणाकडून त्रास होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लक्ष देण्यास सांगीतले होते. एवढेच नव्हे तर त्याच्याशी ओळख करून देवुन कुणी काही त्रास दिल्यास फौजदार काकांना भेटायचं म्हणून सांगीतले होते.
या ओळखीचा फायदा घेत गेल्या पाच दिवसांपूर्वी या विकृताने सदर मुलीचा मोबाईल नंबर मिळविला व चार दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधायला सुरवात केली होती असे एकण्यात आहे.

मात्र ३०नोव्हेंबर रोजी या विकृत मनोवृत्तीच्या माणसाने या मुलीशी संपर्क साधत वेगळं कारण दाखवुन एका ठिकाणीं बोलावले व ती मुलगी आल्यावर दोघांची सेल्फी काढून लगेचच ब्लॅकमेल करायला सुरुवात केल्याचे सांगीतले जात आहे. मात्र त्याचे हे वेगळे रूप पाहून मुलगी एकदम घाबरली व तेथून पळत घरी निघाली.सदरचा प्रकार तिने घरी सांगितल्यावर घरच्यांनी इतरांच्या मदतीने या विकृत पोलिस उप निरीक्षकाला गाठले.
त्याला जाब विचारत असताना मोठमोठ्याने होणारा आरडाओरड पाहता हा हा म्हणता मोठा जनसमुदाय जमला संतप्त जमावाकडून या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला धू.. धू.. धुवत पोलिस स्टेशनला धींड काढत नेण्यात आले.या प्रकाराची वार्ता पूर्ण शहरात पसरली तसतशी धरणगाव पोलिस स्टेशनच्या आवारात मोठी गर्दी जमली. माजी आमदार स्मिताताई वाघ,भाजपाचे पी.सी. पाटील,सर्वपक्षीय पदाधिकारी अन् कार्यकर्ते जमा झाले.जनसमुदायाच्या संतप्त भावना,परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन व मुलीच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून सर्व राजकीय नेत्यांनी तक्रार न देण्याचा निर्णय घेत मध्य साधून संबधित पोलिस उपनिरीक्षक ‘या गवारेला अद्दल घडावी, व भविष्यात अजून कुणी तसे धाडस करू नये..! म्हणून त्याची प्रथम तात्काळ बदली करून निलंबनाचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी लावून धरली.
धरणगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी संपुर्ण परिस्थिती अतिशय व्यवस्थितपणे हाताळत घडलेला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी तात्काळ बदलीचे आदेश काढले. परंतू जमलेला संतप्त जमाव त्या विकृत पोलिस उपनिरीक्षकाच्या नीलंबनावरच अडून बसल्याने त्याच्याविषयी जनतेच्या सामुहिक तक्रारी दाखल करून घेत निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्याच्या आश्वासनावरच जनसमुदाय माघारी फिरला.

Leave A Reply

Your email address will not be published.