Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हे कुठेतरी थांबलं पाहीजे..!

11

ऑनर किलींग कँन बी स्टॉप्ड !

   ऑनर म्हणजे सन्मान, प्रतिष्ठा.प्रतिष्ठासाठी खून म्हणजे ऑनर किलींग.घटना घडली.पोलीस आले.आरोपी पकडले.कोर्ट चालले.शिक्षा झाली. बस्स! पण मग,थांबले का?पुन्हा पुन्हा का घडले? कोर्टातील शिक्षा मुळातच प्रायश्चित्तासाठी दिली जाते. त्यात आरोपीचा सुड उगवण्याचा हेतू नसतोच.आरोपी आणि न्यायाधीश यांचा सुतराम संबंध नसतो.तरीही शिक्षा देतोच.हेतू हाच.आरोपीला पश्चाताप झाला पाहिजे. शिवाय पुन्हा तसे घडू नये.
 आरोपीला शिक्षा म्हणजे पश्चाताप होणे.येथपर्यंत कोर्टाचा हेतू सिद्ध होतो.पण पुन्हा असे होऊ नये हे मात्र साध्य होत नाही. घटना पुन्हा पुन्हा घडतच असतात. पोलीस आणि न्यायाधीश फक्त घटनेवर प्रतिक्रिया देतात.घटना पुन्हा घडू नये म्हणून काहीच करीत नाहीत. याला हाफ ज्यडिशियरी म्हणतात.कंप्लीट ज्युडिशियरी नाही. फक्त घटनेचा मागोवा घेतला जातो.घटनेचा पाठलाग करतो.त्यावर प्रतिक्रिया देतो.निर्मूलन होत नाही. थांबवता येत नाही.हे अपुर्ण आहे.
  बहिणीने प्रेमविवाह केला. भाऊने किंवा बापाने किंवा आईने खून केला.हे थांबवणे गरजेचे आहे.कसे थांबेल?याची कारणे आहेत.सुरू का झाले? सुरू कसे झाले?सुरू कोणी केले?यातच याची कारणे दडलेली आहेत.याची सुरुवात सरकारमधे बसलेल्या लोकांनी केली आहे.पण सरकार म्हटले कि कोणी विरोधात बोलत नाही. सरकार ची चूक आहे.ती अशी..
   मुलींचा बालविवाह होऊ नये.हे योग्यच.पण जेंव्हा लग्नाची  ईच्छा होते तेंव्हा तर लग्न झाले पाहिजे.तेथे मात्र वयाचा बांध घालून ठेवला आहे.१८पेक्षा जास्त पाहिजे. का १८वर्षे? कोणी ठरवले?का प्रयत्न करीत आहात दडपून टाकण्याचा?शक्य तरी आहे काय? लग्नाची  ईच्छा कोणत्याही कायद्याने दडपून टाकता येत नाही.तरीही सरकार दडपण्याचा प्रयत्न करते.तेच चुकीचे आहे.येथेच ऑनर किलींग चे कारण सापडते.
   मुलगा असो कि मुलगी वयात आले कि,लैंगिक भावना जागृत होतात.लग्न करायची अतिव ईच्छा होते.तेथे वय कमी असल्याची अडचण सांगितली जाते. मन लग्नास तयार आहे तर  वयाची अडचण का?  १८ वर्षे वयाची वाट का पहावी?का अडवून ठेवले जाते?१८ वर्षे होण्याची वाट पाहायची तोपर्यंत लैंगिक ईच्छा दडपून टाकणे शक्य होत नाही. ती प्राकृतिक वृती आहे.प्राकृतिक वृत्तीला दडपणे म्हणजे विकृती आहे.प्राकृतिक वृतीला आळा घालणे ईश्वराला ही शक्य झाले नाही. तर माणसाला तरी कसे शक्य आहे? आहार, निद्रा,मैथून याला लगाम लावणे कोणालाही शक्य झाले नाही.ब्रम्हदेवालाही शक्य झाले नाही. विश्वामित्राला शक्य झाले नाहीत. कोणालाही शक्य होणार नाही. तर मग,तसा प्रयत्न  माणसाने किंवा सरकारने करूच नये.म्हणून लग्नाचे वय १८ झालेच पाहिजे, असा दंडक घालू नये.अथातो लग्न जिज्ञासा.जेंव्हा लग्नाची  ईच्छा होईल तेंव्हा लग्न करण्याची मुभा असावी.ईच्छा होणे म्हणजेच तयारी होणे.Will is internal character.Not the external character.म्हणून त्याचा इलाज बाहेरून नाही. शमवणे हाच त्यावरचा इलाज आहे.तृप्ती हाच त्यावरचा पर्याय आहे.
 जेंव्हा मुलगा किंवा मुलीची  लग्न करण्याची ईच्छा होते तेंव्हा ते आई बाप भाऊच्या मर्जीप्रमाणे लग्न करायला तयार असतात.पण जेंव्हा लग्नाची ईच्छा मारून मारून मन सैतान बनते तेंव्हा  मुले आणि मुली  ही आई बाप भाऊ किंवा अन्य कोणा पालकाचे ऐकून घेत नाहीत.कुंटुंबावरचा,पालकावरचा त्यांचा विश्वास उडालेला असतो.विश्वास संपला कि कोणतीही समजूत लागू पडत नाही. मन उधाण वाऱ्यासारखे बनते.तेंव्हा जे जे समोर सापडेल त्यावर आधारित लैंगिक ईच्छा शमवण्याची घाई झालेली असते.मिळेल तो जोडीदार स्विकारला जातो.तेच आई बाप भाऊ किंवा अन्य पालकांना खटकते.तेथेच प्रतिष्ठेला ठेच पोहचते.प्रेम,आस्था हिंसक वळण घेते.अघोरी कृत्य घडते.रक्ताचे नाते ओलांडले कि आस्था,प्रेम आटते.पोटचे लेकरू कोंबडी, बकरी सारखे क्षुल्लक वाटू लागते.एकेकाळी प्रेम करणारे मन आता द्वेष,मारहाण,फासी,खून असे काहीही करायला तयार होते.म्हणून अशा घटना  घडतात. 
    लैंगिक वृतीला बांध घालणे,पालकांवरचा विश्वास उडणे,उधाण मनाने बांध तोडणे,पालकांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेंच पोहचणे या साखळीतून द्वेष,मारहाण,फासी,खून पर्यंत मनाची मजल जाते. याला ऑनर किलींग म्हटले जाते.घटना ऐकून सुन्न होतो. बातम्या वाचून हाय करतो. पण विसरतो.हेच चुकीचे आहे.हेच अर्धवट आहे.हेच  बधीरपणाचे लक्षण आहे.हेच संवेदनहिनतेचे लक्षण आहे.ही ऑनर किलींग ची दुसरी बाजू आहे.जबाबदार पालकांनी बेजबाबदार बनणे हेच ऑनर किलींग चे खरे कारण आहे.त्या कारणाचे निर्मुलन केले तर ऑनर किलींग थांबू शकते.
 प्रेमविवाह,आंतरजातीय विवाह, आंतरधर्मिय विवाह, आंतरदेशीय विवाह,प्रतिलोम विवाह करण्यात पालकांची सहमती घेणे आवश्यक आहे.

….शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
संस्थापक (महाराष्ट्र जागृत जनमंच)

Leave A Reply

Your email address will not be published.