Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा
हायलाइट्स:
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी कर्नाटक दौऱ्यावर.
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार.
- दोन्ही राज्यांतील संवाद वाढावा म्हणून पाटील यांचा दौरा.
वाचा:‘शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढावे ही महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा!’
जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना सोबत घेऊन ही चर्चा केली जाणार आहे. ही चर्चा थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी नमूद केले.
वाचा:‘हा’ प्रकल्प देणार ७५ हजार नोकऱ्या!; भूमिपुत्रांबाबत CM ठाकरे म्हणाले…
‘ कृष्णा नदी ‘चा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. यात कमीत कमी नुकसान कसं होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर बैठक होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल, हा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
वाचा: मोठी बातमी: धारावी करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर; उरलेत फक्त सहा रुग्ण