Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
- दिवसभरात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान.
- १४,३४७ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.
वाचा: बीडमध्ये करोना रुग्ण का वाढताहेत?; अजित पवारांनी घेतली तातडीची बैठक
राज्यात करोनाचा ग्राफ खाली येत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक अशा प्रमुख शहरांत रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत असून करोना पॉझिटिव्हिटी रेटही खाली आला आहे. आजच्या करोनाच्या आकडेवारीवर नजर मारल्यास दिलासा देणारे अनेक आकडे त्यात समोर येत आहेत. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ९६ टक्क्यांच्या जवळ पोहचले आहे. राज्यात सध्या करोनाचे १ लाख ३४ हजार ७४७ रुग्ण आहेत. त्यात पुणेकरांना सर्वात दिलासा मिळाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत सातत्याने सर्वात वर राहिलेल्या पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या आता मुंबईपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य विभागाच्या आजच्या नोंदीनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या १८ हजार ७६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर पुणे जिल्ह्यात ही संख्या १७ हजार ८८८ इतकी आहे. मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार मात्र मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या १४ हजार ८६० इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात १३ हजार ९७० तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ हजार ४५३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
वाचा: मुंबई: बोगस लसीकरण प्रकरणी चौघे अटकेत; तपासात धक्कादायक बाब उघड
राज्यातील आजची स्थिती
– आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ % एवढा आहे.
– गेल्या २४ तासांत ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान तर १४ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यशस्वी.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७३% एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा: इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे पाऊल; CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’ सूचना