Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार

48

हायलाइट्स:

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक पार पडली.
  • महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक सरकारने धरणांवर रियल टाईम डेटा सिस्टिम बसवावी, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
  • पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन धरणांमधील पाणीसाठ्याचा योग्य विसर्ग करून पुराचा धोका टाळण्याचा निर्धार दोन्ही राज्यांनी केला.

म. टा. प्रतिनिधी, सांगली

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटकातील पुराचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक शनिवारी बंगळूर येथे पार पडली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक सरकारने धरणांवर रियल टाईम डेटा सिस्टिम बसवावी, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. दरम्यान, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन धरणांमधील पाणीसाठ्याचा योग्य विसर्ग करून पुराचा धोका टाळण्याचा निर्धार दोन्ही राज्यांनी केला. (It was decided at the joint Maharashtra-Karnataka meeting to reduce the risk of floods through coordination)

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा उत्तर कर्नाटकात महापुराने मोठे नुकसान झाले होते महापुराचा धोका टाळण्यासाठी गेल्या वर्षी दोन्ही राज्यांच्या जलसंपदा विभागाने समन्वय साधून धरणांमधील पाण्याच्या निसर्गाचे नियोजन केले या समन्वयामुळे गेल्यावर्षी महापुराचा धोका टाळता आला याहीवर्षी दोन्ही राज्यांमध्ये योग्य समन्वय राहावा यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही राज्यांच्या जलसंपदा विभागांनी माहितीचे आदान-प्रदान केले.

क्लिक करा आणि वाचा- सतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू

बैठकीबाबत माहिती देताना मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्राने पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिअल टाइम डेटा सिस्टीम बसवली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने अद्याप ही सिस्टीम बसवलेली नाही. कर्नाटक प्रशासनाने तातडीने ही सिस्टीम अलमट्टी धरण परिसरात बसवावी, असे आवाहन केले आहे. या सिस्टीममुळे संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल. रिअल टाइम डेटा सिस्टीममुळे पाण्याच्या प्रवाहाची माहिती अचूक मिळते.

क्लिक करा आणि वाचा- 55th foundation day of shiv sena शिवसेना वर्धापन दिन Live: ‘लोक चिंतेत असताना स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील’

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या समन्वयामुळे पुराचा धोका कमी होणार आहे. यानंतरही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षमपणे सामना करेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीला दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- ‘शिवप्रसाद सामनाच्या कार्यालयात पाठवू का?’; नितेश राणेंचा राऊतांना टोला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.