Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती

19

हायलाइट्स:

  • मुंबईतील करोना संसर्ग आटोक्यात
  • सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?
  • महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती

मुंबईः करोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ लागला असला तरी अद्यापही घटत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई सध्या गट क्रमांक एकमध्ये आली असली, तरीही काही निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. मुंबई लोकलबाबतही सावध भूमिका घेण्यात येत आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यामांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबतची भूमिकाही स्पष्ट केली आहे. ‘मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली की लोकलबद्दल विचार करु. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल,’ अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसंच, ‘इतरांच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने महापालिका व राज्य सरकार वागणार नाही,’ असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाःउद्धव साहेब! मोदींशी पुन्हा जुळवून घ्या; ठाण्यातील नेत्याच्या पत्रामुळं खळबळ

‘आजही मुंबईत पाचशे ते सहाशेच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या आणखी कमी व्हायला हवी. धारावीत शून्य रुग्णवाढ आहे. वरळीत काल एकच रुग्ण आढळून आला म्हणजेच मुंबईतील संसर्ग कमी होतोय,’ असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

वाचाः
नाना पटोलेंचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर म्हणाले…

‘तिसरी लाट आली तर सगळ्यांसाठी भयंकर असेल. आता त्या विषाणूचं स्वरुप बदलत आहे. त्यामुळं सगळ्यांनी कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. जर नागरिकांनी काळजी घेतली, तर आपण ज्याप्रमाणे दुसरी लाट थोपवण्यात यशस्वी झालो. तसंच, तिसऱ्या लाटेतही यशस्वी होऊ,’ असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

वाचाः पुणेकरांसाठी चांगली बातमी! शहरातील करोना रुग्णांची संख्या घटली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.