Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला सर्वात मोठे खिंडार; अनेक दिग्गज पदाधिकारी केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश..

14

मराठवाड्यात कॉंग्रेसला बळ; राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपला सर्वात मोठे खिंडार

परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक दिग्गज पदाधिकार्‍यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई, दि.१३: :- राजकारणात फोडाफोडी होतेच; त्याला जशास तसे उत्तर द्यायचे असते असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्यापार्श्वभूमीवर कॉंग्रेसला ताजे करण्यासाठी काही महत्वाच्या पदाधिकार्‍यांचा पक्ष प्रवेश घेत काँग्रेस पक्ष कामाला लागल्याचे दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला खिंडार पडून लवकरच महत्वाच्या पदावर असलेल्या स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईतील टिळक भवन येथे विविध पक्षातील महत्वाचे पदाधिकारी, विद्यमान तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्यांचा कॉंग्रेसमध्ये भव्य प्रवेश समारोह झाला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला आहे. या प्रवेशामागे खरा चेहरा सुरेश कुंडलिकराव नागरे यांचा असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
राज्यात स्वबळावर निवडणुकांच्या तयारी चालविलेल्या आणि त्यासाठी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असतानाच मालेगावमधील काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचे पडसाद महाविकास आघाडीवर विशेषत: दोन्ही काँग्रेसच्या राजकारणावर उमटत आहेत.
“ज्यांनी स्वत: पक्ष सोडला; त्यांनी नाराजी मांडण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही काहीजण काँग्रेसमध्ये येणार आहेत. ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, त्यांचेही भविष्यात काय करायचे ते ठरवू महाविकास आघाडी असली, तरीही, राजकारण सुरूच असते. अशा राजकारणाला त्याच भाषेत उत्तर द्यायचे असते. तशी तयारी काँग्रेसची आहे. काँग्रेस पक्ष गप्प बसणारा नाही.” असे पटोले म्हणाले होते.

अ.क्रं. पक्षाचे नाव पद पदाधिकार्‍याचे नाव
१ भाजप विद्यमान तालुका अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष, जिंतूर ता. श्री. प्रताप विनायकराव देशमुख
२ राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस (ओबीसी सेल) तथा परभणी जिल्हापरिषदेचे माजी सभापती तसेच विद्यमान जिल्हापरिषद सदस्य श्री. नानासाहेब लक्ष्मणराव राऊत
३ राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हापरिषद सदस्य, जिंतूर तालुका, आडगाव सर्कल श्री. अविनाश काळे

४ भाजप माजी नगरसेवक तथा भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते, जिंतूर शहर श्री. प्रदिप उर्फ पिंटू सुंदरराव चव्हाण
५ राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी सभापती, पंचायत समिती, जिंतूर श्री. वचिष्ट गायकवाड
६ भाजप माजी सभापती, पंचायत समिती, जिंतूर श्री. रामरावजी हुलगूंडे
७ शेतकरी संघटना जिंतूर तालुका अध्यक्ष इरशाद पाशा चॉंद पाशा
८ शिवसेना पंचायत समिती सदस्य आसेगांव तथा जिंतूर तालुका अध्यक्ष श्री. भारत पवार
९ भाजप नगरसेवक, जिंतूर अब्दुल रेहमान
१० भाजप नगरसेवक, जिंतूर फिरोज कुरेशी
११ राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष, जिंतूर शेख मुखीद

अ.क्रं. पक्षाचे नाव पद पदाधिकार्‍याचे नाव
१ नगर अध्यक्ष न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी विनोदराव हरिभाऊकाका बोराडे
२ उपनगर अध्यक्ष न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी प्रभाकर भाउसाहेब सुरवसे
३ नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी सौ. सुनिता चव्हाण
४ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी गौतम धापसे
५ नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी सौ. शोभा कोरडे
६ नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी शेख अखतर बेगम आय्युब
७ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी वाहेद अन्सारी
८ नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी सौ. उषा दौंड
९ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी शेख हरिम
१० नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्रीमती कमलाताई झमकडे
११ नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी सौ. उर्मिला विनोदराव बोराडे
१२ नगरसेविका न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी सौ. विश्रांती जाधव
१३ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. अशोक टेकचंद मंत्री
१४ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. राधा किशन केवारे
१५ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. मारोती चव्हाण
१६ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. कांचन कोरडे
१७ नगरसेवक न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. बबन गायकवाड
१८ संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू श्री. व्यंकटेश चव्हाण
१९ उपाध्यक्ष ख.वि.संघ सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. लक्ष्मण बुरेवार
२० माजी सरपंच झोडगांव, ता. सेलू, जि. परभणी श्री. राजेंद्र पवार
२१ राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी जिल्हा परिषद सदस्य, सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. डॉ. जगन्नाथ जाधव
२२ माजी सरपंच, घोडके पिंपरी, ता. सेलू, जि. परभणी श्री. रामप्रसाद घोडके
२३ सरपंच, खवणे पिंपरी, ता. सेलू, जि. परभणी श्री. श्याम चव्हाण
२४ संचालक, वि.कार्य.सो. रवळगांव, ता. सेलू, जि. परभणी श्री. राजाभाऊ रोडगे
२५ सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. बालाजी झमकडे
२६ सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. गणेश चव्हाण
२७ सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. प्रफुल्ल गिल्डा
२८ माजी उपनगर अध्यक्ष न.प. सेलू, ता. सेलू, जि. परभणी शाहीद अब्दुल वाहेत अंन्सारी
२९ राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी नगरसेवक, शहर कार्याध्यक्ष, सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. अरुज आली खा अजीज खा
३० राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष, सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. अन्वर खा अफसर खा पठाण
३१ नगरसेवक, सेलू, ता. सेलू, जि. परभणी श्री. शेख कासीम
३२ चेअरमण, वि.कार्य.सो. निपाणी टाकळी, ता. सेलू, जि. परभणी श्री. अविनाश रामभाऊ शिंदे

Leave A Reply

Your email address will not be published.