Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई,दि.२३ :- अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे.मलिक यांच्या घरावर छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते.
ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी सुरु होती. ईडीने सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीच्या कार्यलयात तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. कारवाई झाल्यानंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मेडिकल टेस्टसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. लवकरच ईडीमार्फत त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.ED कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. आता त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी मलिकांना जे जे रुग्णालयात नेण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून मलिकांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मलिक यांच्या अटकेने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत सध्या आहे.ईडीच्या गाडीत बसताना मलिकांनी ‘लडेंगे और जितेंगे’, असं म्हटलं. मोठ्या सुरक्षेमुळे मलिकांपर्यंत पत्रकारांना पोहोचता आलं नाही. मात्र, ईडीच्या चौकशीतून सुटल्यानंतर मलिकांनी पहिल्यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली.नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१९९३ च्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याचं समोर आलंय आहे