Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ED issues third summons to anil deshmukh:अनिल देशमुख यांना ईडीचे तिसरे समन्स; ५ जुलैला हजर राहण्याच्या सूचना
हायलाइट्स:
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) तिसरे समन्स आहे.
- सोमवारी ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देशमुख यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश.
- ईडीने देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते.
अनिल देशमुख या आधी दोन समन्म मिळूनही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नव्हते. माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही, असे देशमुख यांनी ईडीला कळवले होते. इतकेच नाही, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी चौकशीसाठी तयार आहे, असेही देशमुख यांनी ईडीला कळवले होते.
क्लिक करा आणि वाचा- सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास
ईडीने देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. तर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दरम्यान अनिल देखमुख हे आता कार्टाच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. कोर्टाकडून आपल्याला नक्की दिलासा मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र, देशमुख यांनी ईडीला दिलेली हजर न होण्याची कारणे ईडीने बाजूला सारत तिसरे समन्स बजावले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण: फेरविचार याचिका दाखल करायलाच नको होती; राऊत यांची केंद्रावर टीका
आपण सर्वप्रकारच्या चौकशीसाठी तयारच आहोत, परंतु आधी आपल्याला दस्तावेज देण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून केली होती. देशमुख यांनी ईडीकडे या प्रकरणाच्या ईसीआयआरची प्रत देखील मागितली आहे. १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी नेमकी कशाप्रकारच्या तक्रारीचा अहवाल तयार करण्यात आला याची सविस्तर माहिती या ईसीआयआरमध्ये असते.
क्लिक करा आणि वाचा- राज्यात ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न?; फडणवीस म्हणतात…
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. पुढे ईडीने देशमुख यांच्यासह त्यांच्या संबंधितांच्या घरावर छापेही टाकले.