Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे महापालिकेचे बजेट ; यंदा ८ हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर

7

पुणे,दि ०७ :- पुणे महानगरपालिकेचे सन २०२२ – २३ साठीचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर करण्यात आले आहे यावर्षीसाठी तब्बल ८ हजार ५९२ कोटींचे बजेट असणार आहे. गतवर्षी पेक्षा ९४२ कोटीने हे वाढविले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे बजेट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. अंदाजपत्रकात भांडवली व विकास कामांसाठी २ हजार ७४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा प्रकल्प करिता ६६२ कोटी, मलनिस्सारण प्रकल्प करीता ३०७ कोटी तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी पालिकेचे उत्पन्न ५४०० कोटी झाले आहे. एकूण खर्चात ५०० कोटींची वाढ झाली असून ४ हजार ७०० कोटी महसुली खर्च तर ३ हजार ९०० कोटी विकास कामांसाठी तरतुद करण्यात आली आहे.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर श्रीमती सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,विरोधी पक्षनेत्या श्रीमती दिपाली धुमाळ, आबा बागुल गटनेते काँग्रेस, पृथ्वीराज सुतार गटनेते शिवसेना, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व ज्ञानेश्वर मोळक, मुख्यलेखा व वित्त अधिकारी श्रीमती उल्का कळसकर तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.