Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य द

10

पुणे,दि.२७ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबतची पाहणी त्यांनी केली.

यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याने सदर रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. स्वस्त धान्य दुकानदार धनंजय दाभाडे प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक करत आपले असेच चांगल्या पद्धतीने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नायब तहसीलदार सरिता पाटील, पुरवठा निरीक्षक दीपक चव्हाण,मंडळ अधिकारी तसेच तलाठी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या मार्गर्शनाखाली आयएसओ नामांकनासाठीची मोहीम पुणे जिल्ह्यात राबवली जात आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यासाठी सातत्याने तालुकानिहाय आढावा घेत आहेत. या मोहिमेला स्वस्त धान्य दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.