Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंदापूर शहराचा थोड्याच दिवसात चेहरा बदलणार गिरवी येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार. 

6

नीरा नरसिंहपूर, दि.२७ :- गिरवी तालुका इंदापूर येथील विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. गिरवी ग्रामस्थांच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गावच्या वतीने हार फेटा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे बोलत म्हणाले की ज्या जीवाभावाच्या भावांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या लोकांना मी कधीच विसरणार नाही मतदान रुपी मला आशीर्वाद देऊन राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो याचा विसर पडू देणार नाही देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे, शंकराव पाटील गणपतराव पाटील राजेंद्र घोलप यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आसल्यामुळे इंदापूरचा थोड्याच दिवसात चेहरा-मोहरा बदलणार आहे. तालुक्यात नारळ फोडायचा नेहमीच कार्यक्रम आसतो ज्या लोकांना अधिकार नाही तेच लोक मि केलेल्या कामांचा नारळ फोडण्याचे श्रेय घेत आसतात हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की निष्क्रिय मंत्री कोण आहे ते जनताच ठरवेल उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार.
उपसरपंच दादासाहेब शिरसागर यांनी मारुती मंदिरासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली आसता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 15 लाख रुपये निधी लगेच मंजूर केला. याबद्दल गिरवी येथील ग्रामस्थांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार व्यक्त केले. उद्घाटन केलेली कामे,, जलजीवन मशीन पाणी पुरवठा योजना 1 कोटी 29 लाख,, मारुती मंदिर सभामंडप 10लाख गिरवी ते पाटील वस्ती ठोकळे वस्ती डांबरीकरण 3 कोट 25 लाख,, नरुटे वस्ती डिस्प्ले कोकाटे शिरसागर वस्ती ते गिरवी पिंपरी बुद्रुक डांबरीकरण 1कोटी,, पानंद रस्ता 24 लाख, एकूण उद्घाटन केलेली एकूण कामे  5 कोटी 88 लाख सरपंच पांडुरंग डीसले, व उपसरपंच दादासाहेब शिरसागर,या दोघांनी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे गिरवी गावच्या विकासाचा कायापालट होणार आसल्याची चर्चा गावातील ग्रामस्थांकडून येत आहे.गिरवी  गावासाठी एवढा मोठ्या प्रमाणात निधी  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. त्याच कामाचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राज्यमंत्र्यांचे या भागातून सर्वच  ग्रामस्थांच्या वतीने कौतुक व आनंद व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य  अभिजीत तांबिले, माजी सभापती प्रशांत पाटील, महादेव जानवर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे, उपअध्यक्ष नवनाथ रुपनवर, बाळासाहेब करगळ, विजय घोगरे, सुरेश शिंदे,  माजी सरपंच श्रीकांत बोडके, माजी सरपंच नरहरी काळे, सचिन सपकाळ, शुभम निंबाळकर समाधान बोडके, संतोष सुतार, सुदर्शन बोडके, सुनील पालवे, या पडसळकर, गिरवी गावचे सरपंच प्रतिनिधी पांडुरंग डिसले, उपसरपंच पांडुरंग बोडके,  माजी सरपंच सोमनाथ मोहिते, सरपंच चंद्रकांत सरवदे, सरपंच सुनील जगताप, आरुण क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, माजी सरपंच विठ्ठल देशमुख, माजी सरपंच जगदीश सुतार, नाथा रुपनवर, नागेश गायकवाड, दशरथ राऊत, गोविंद सूळ, विस्तार अधिकारी इनुस शेख, कदम साहेब महेश शिरसागर, आनिल शिरसागर ,राजेंद्र जगताप, माजी सरपंच उस्मान शेख, विद्यमान सरपंच पार्वती  डिसले, उपसरपंच दादासाहेब शिरसागर व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत गिरवी गावांमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार

Leave A Reply

Your email address will not be published.