Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे विभागातील 16 लाख 66 हजार 585 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 17 लाख 47 हजार 502 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : पुणे विभागातील 16 लाख 66 हजार 585 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 47 हजार 502 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 593 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 36 हजार 324 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.37 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 59 हजार 337 रुग्णांपैकी 10 लाख 31 हजार 181 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 941 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.34 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 488 रुग्णांपैकी 1 लाख 85 हजार 849 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 827 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 812 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 66 हजार 126 रुग्णांपैकी 1 लाख 59 हजार 192 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 505 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 52 हजार 752 रुग्णांपैकी 1 लाख 38 हजार 840 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 715 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 69 हजार 799 रुग्णांपैकी 1 लाख 51 हजार 523 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 945 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 564 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 533 , सातारा जिल्ह्यात 1 हजार 170, सोलापूर जिल्ह्यात 412, सांगली जिल्ह्यात 995 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 454 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 854 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 555, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 327, सोलापूर जिल्हयामध्ये 278, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 82 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 612 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 44 लाख 11 हजार 250, सातारा जिल्ह्यामध्ये 9 लाख 74 हजार 344, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख 69 हजार 975, सांगली जिल्हयामध्ये 9 लाख 26 हजार 9 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 13 लाख 56 हजार 359 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 11 लाख 49 हजार 409 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 47 हजार 502 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 7 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)