Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जुलै २०२१ पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
- महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ३७(१) (३) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केले आहेत.
- शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे.
शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखाविली जाण्याची शक्यता असते.) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे, कलम ३७ (३) नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ५ अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे या कृत्यास मनाई असेल.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या मनात ‘ही’ शंका दिसतेय; प्रवीण दरेकर यांचा टोला
हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- निरोगी महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण
या कालावधीत मिरवणूकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील असे आदेशात नमूद केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना ‘हा’ आदेश