Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद; ४ हजार ५५२ नोंद

4

पुणे, दि..१२ :- जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात ४ हजार ५५२ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.

त्यानुसार बुधवार ११ मे रोजी आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून सदर फेरफार अदालतीमध्ये साध्या ३ हजार ६८४ , वारस ६७६ आणि तक्रारी १९२ अशा एकूण ४ हजार ५५२ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

*बारामती तालुक्यात सर्वाधिक फेरफार नोंदी निर्गत*

बारामती तालुक्यात सर्वाधिक ६६५ तर दौंड तालुक्यात ५९७ नोंदी निर्गत करण्यात आल्या. हवेली तालुक्यात ३६८, पुणे शहर ९, पिंपरी चिंचवड १४८, शिरुर ५९१, आंबेगाव ४२७, जुन्नर २८१, इंदापूर २१५, मावळ २४५, मुळशी ८५, भोर १२३, वेल्हा १११, पुरंदर २१८ आणि खेड तालुक्यात ४६९ फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.