Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे महानगरपालिका व डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन !

7

पुणे,दि.१५ :-डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवाभावी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान असून पुणे शहरातील विविध भागांत दर वर्षी त्यांचेमार्फत स्वच्छता अभियान राबविले जाते. स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष “पद्मश्री” पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १५/०५/२०२२ रोजी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोथरूड, केळेवाडी मधील मोगल चौक ते ARAI कंपनी गेट, किष्किंधानगर, सुतारदरा मैदान, पर्वती टेकडी, पर्वती जनता वसाहत चुनाभट्टी कॉर्नर, गोसावीवस्ती, वारजे कर्वेनगर जलशुद्धीकरण प्रकल्प, होम कॉलनी वडारवाडी, खानवस्ती रोड, रामनगर, येरवडा कळस धानोरी, स्वीपर चाळ, भैयावाडी, मदारवस्ती, धनकवडी, राऊतबाग धनकवडी, कात्रज नवीन वसाहत, कात्रजतलाव, गुगळे प्लॉट, इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ मा. श्रीमती रुख्मिणी गलांडे, एसीपी, पुणे शहर तसेच. श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे मनपा व समन्वयक स्वच्छ भारत अभियान यांच्या हस्ते झाला. यावेळी मा. श्रीमती दिपालीताई धुमाळ विरोधी पक्षनेते, मा. श्री. लघुअण्णा निवंगुणे, बारामती लोकसभा अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका व इतर मान्यवर उपस्थित होते. श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन व समन्वयक स्वच्छ भारत अभियान व मा. आरोग्य अधिकारी श्रीमती केतकी घाटगे यांनी डॉ.. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांना कचरा उचलण्यासाठी कर्मचारी व कचरा गाड्या उपलब्ध करून देणेबाबात सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक आणि विभागीय आरोग्य निरीक्षक यांना सूचना केल्या.

यामध्ये शहरातील विविध ठिकाणच्या ६० झोपडपट्ट्यामधील ८.५ किलोमीटर परिसरातील ४,४५४ स्वयंसेवक यांचेमार्फत एकूण १९० टन ६० किलो कचरा गोळा करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान यशस्वी करणेसाठी केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे असे सांगून प्रतिष्ठानने पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.