Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचा मोर्चा.
- बैलगाडी मोडल्याने भाई जगतापांसह अनेकजण कोसळले.
- व्हिडिओ पोस्ट करत भाजपने दिला खोचक सल्ला.
वाचा:हिंगोलीत वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात; भरधाव टेम्पोची धडक
पेट्रोल डिझेल दरवाढीविरुद्ध मुंबईत अँटॉप हिल येथील भरणी नाका भागात आज सकाळी काँग्रेसने बैलगाडी मोर्चा काढला होता. बैलगाडीवर भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उभे होते. अधिक भारामुळे अचानक बैलगाडी तुटली आणि जगताप यांच्यासह बैलगाडीतील सर्वजण खाली कोसळले. यात जगताप यांना कोणतीही इजा झाली नाही मात्र काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतरही काँग्रेसची निदर्शने सुरू होती.
वाचा:केंद्रात सहकार खातं: ठाकरे सरकारमधील मंत्र्याने व्यक्त केली ‘ही’ भीती
अशी घडली दुर्घटना…
बैलगाडीवर भाई जगताप सर्वात पुढे होते. त्यांच्यासोबत जवळपास डझनभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैलगाडीवर उभे होते. या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्याचदरम्यान, एक कार्यकर्ता जगताप यांच्याकडे सिलेंडर देत असतानाच बैलगाडी तुटली आणि बैलगाडीवरील सर्वजण खाली कोसळले. त्यामुळे काहीशी घबराट पसरली मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. याआधीही राजकीय कार्यक्रम वा आंदोलनात अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर गर्दी केल्याने क्षमतेपेक्षा जास्त वजन होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.
वाचा: भास्कर जाधवांना विधानसभाध्यक्षपदाचे वेध, मात्र थोरात म्हणाले…
राज्याच्या राजकारणातही असंच होईल…
काँग्रेसच्या मोर्चातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधी पक्ष भाजपने यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाई जगताप यांना टॅग करत एक खोचक ट्वीट केले आहे. ‘तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलेत तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा’, अशी टोलेबाजी उपाध्ये यांनी केली आहे.
काँग्रेसच्या आंदोलनावेळी बैलगाडीवरून कोसळले काँग्रेस कार्यकर्ते
वाचा: नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू; चंद्रकांत पाटलांनी डिवचलं