Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(संपादक-शैलेश चौधरी)
एरंडोल:येथे १५जुलै २०२१ रोजी तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय पदविका प्रमाणपञ धारक चिकीत्सक सेवादात्यांची बैठक पार पडली त्यात पदविका व प्रमाणपञधारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परीषद कायदा १९८४ च्या पहील्या अनुसूचितांना समाविष्ट करणे,दि. २७ऑगस्ट २००९ रोजी ची शासन अधिसुचना रद्द करून सुधारीत अधिसुचना निर्गमित करणे,राज्यस्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त असलेली पदे त्वरीत व प्रचलित पध्दतीने भरणे व राज्यात १२वी नंतरचा ३ वर्षीय पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम सूरू करण्याबाबतच्या मागण्यांसाठी सूरू असलेल्या पशुचिकित्सा खाजगी व्यवसायी संघटना महाराष्ट्र यांना पाठींबा देत जोपर्यंत या सर्व मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत दि.१६ जुलै २०२१ पासून काम बंद आंदोलन पुकारले जाणार असून तालुक्यातील कोणतेही खाजगी पशुवैद्यकीय चिकीत्सक सेवादाते सेवा देणार नसल्याचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील,उपाध्यक्ष एन. के. जाधव,सचिव शिवकुमार देवरे यांनी सांगीतले.
याप्रसंगी डॉ.शांताराम पाटील,प्रमोद देवरे,भाऊसाहेब पाटील,चंपालाल पाटील,शैलेश चौधरी,हर्षल पवार,नंदलाल सोनार,आकाश महाजन,रणविर पाटील,आसीफ कुरेशी व तालुक्यातील सर्व खाजगी पशुचिकित्सक सेवादाते उपस्थित होते.