Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत
- साचलेल्या पाण्याचा फोटो ट्वीट करत शिवसेनेवर टीका
- शिवसेना काय उत्तर देणार?
मुंबई शहर व उपनगरात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्यानंतर अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळालं. रेल्वे रुळ नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेले. मध्य रेल्वेवरील मुख्य आणि हार्बर वाहतूक खोळंबल्याने मुंबईकरांनी रुळांवर उतरून चालत जवळचे स्थानक गाठले. रेल्वे ठप्प, रस्त्यांवर वाहतूककोंडी यामुळे नोकरदारवर्गाला कामावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. अमृता फडणवीस यांनीही पावसामुळं साचलेल्या पाण्याचा एक फोटो व शायरी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे.
वाचाः मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले त्याचे कारण काय?; शिवसेना
अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय असतात. राज्यातील घडामोडींवरही त्या ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करत असतात. आताही अमृता यांनी ट्वीट करत मुंबई महापालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘इस शहर मे मिल ही जाएँगे, हर मोड पण गड्ढे तालाब, पर ढुँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब,’ असा खोचक टोला अमृता यांनी शिवसेनेला लगावला आहे. आता अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाःपंढरपूरला एकही एसटी सोडू नका; एसटी महामंडळाचे फर्मान
१० वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी नोंदवलेला पाऊस हा २०११नंतर जुलैमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला. या आधी २०१९मध्ये सांताक्रूझ येथे ३७५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जुलैमध्ये सर्वसाधारण ८४० मिलीमीटर पाऊस पडतो. तर जून आणि जुलैमध्ये मिळून सांताक्रूझ येथे १३३२.५ मिलीमीटर पाऊस पडतो. सांताक्रूझ येथे शुक्रवार सकाळपर्यंतचा पाऊस जुलैच्या एकूण सरासरीच्या ११५.९ टक्के झाला आहे. कुलाबा येथे मात्र जून आणि जुलैची सरासरी पूर्ण होण्यास अवधी आहे. जून आणि जुलैमध्ये कुलाबा येथे एकूण पाऊस १२५१ मिलीमीटर पडतो. आत्तापर्यंत कुलाबा येथे १०६८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वाचाः मुंबईकरांनो काळजी घ्या! पावसाळी आजारांनी वाढवली रुग्णांची गर्दी