Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weather Alert : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट, हवामान खात्याकडून पुन्हा रेड अलर्ट जारी

19

हायलाइट्स:

  • मुंबईकरांसाठी आजही धोक्याची घंटा
  • ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट
  • हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबईत गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे मुंबईची दैना झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आजही मुंबईसह अनेक जिल्ह्यांवर आस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारीही मुंबईत अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आयएमडीने मुंबईत मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे तर उपनगरे आणि कोकण भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून सेंट्रल मेन लाइन ( Central Main Line) आणि हार्बर मार्गावरील ( Harbour Line) गाड्यांवर आजही परिणाम होणार आहे.

आयएमडीनुसार मुंबईत तीन तासांत २५० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला जो रविवारी सकाळी ३०५ मिमीपर्यंत पोहोचला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भारत हवामान खात्याने (IMD) मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबईवर आस्मानी संकट

डॉपलर रडारकडून हवामान खात्याने घेतलेले फोटो फार भयानक आहेत. मुंबईवर सुमारे १८ किलोमीटर म्हणजेच ६० हजार फूट उंच ढग जमा झाले असल्याचं या फोटोंमधून समोर आलं आहे. जे एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे. एव्हरेस्टची उंची सुमारे ९ किलोमीटर आहे. आयएमडीनुसार एका तासाच्या आत सुमारे दीडशे मिलिलीटर पाऊस पडला.

असे म्हटले जाते की, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यावर ढगांची एक जाड थर तयार झाली जी नंतर मुंबईकडे गेली. हवामान तज्ज्ञ अक्षय देव्हरा यांनीही ट्विट करत या वादळाची उंची माउंट एव्हरेस्टच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे असं म्हटलं आहे.
सोलापूरकरांनो सावधान! फोटोमधील ४ अट्टल कैद्यांनी आज जे केलं ते वाचून हादराल
मुसळधार पावसाने मुंबईकरांना रडवलं…

मुंबईकरांसाठी रविवार हा फार धोक्याचा ठरला. कारण, चेंबूरमधील भिंत कोसळणे (Chenmbur wall collapse), विक्रोळी आणि भांडुप या ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain) भिंत आणि घर कोसळण्यासारख्या अपघातात आतापर्यंत तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला.

NDRF आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेंबूर आणि विक्रोळी इथं बचावकार्य संपले असून ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर विक्रोळीत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. भांडुप येथे १ ठार झाल्याची बातमी आहे, तर वाशी नाकाइथेही एकाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Rain Update : मुसळधार पावसाने मुंबईला रडवलं, २४ तासात ३३ जणांचा घेतला जीव

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.