Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

करोना काळातही महापौरांची चमकोगिरी बघा, गाडीच्या VIP नंबरसाठी मोजले तब्बल…!

27

हायलाइट्स:

  • चंद्रपूर पालिकेकडे महापौरांच्या गाडीसाठी पैसा नागरिकांच्या हितासाठी नाही?
  • करोना काळातही महापौरांची चमकोगिरी बघा
  • गाडीच्या VIP नंबरसाठी मोजले तब्बल…!

चंद्रपूर : महापालिकेचा भ्रष्टाचार व महापौरांनी चमकोगिरी बंद करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने चंद्रपूर शहर महानगर पालिकेसमोर आज सोमवारी ‘पुंगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांनी बेड व ऑक्सिजन अभावी आपला जीव गमावला, दुसऱ्या लाटेत केंद्र व राज्य सरकारने करोनावर निधी खर्च करण्यास भर दिला. मात्र, चंद्रपूर मनपा आयुक्तांनी चक्क महापौर यांच्या वाहनाच्या VIP क्रमांकासाठी 70 हजार रुपये मोजले.

चंद्रपूर शहर मनपाने दि 24/2/2021 रोजी वाहन XL6 Alpha Nexa कंपनीच्या वाहन खरेदीसाठी रुपये 11,18,168 / – मंजूर केले. सदर वाहन मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्यासाठी वापरण्यात येणार असल्याने या वाहनाकरीता V.I.P. क्रमांक MH34 BV 1111 यासाठी राज्य परिवहन विभागाकडे तब्बल 70,000 / – रुपये खर्च केले.
Weather Alert : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट, हवामान खात्याकडून पुन्हा रेड अलर्ट जारी
दरम्यान, याच एप्रिल महिन्यात चंद्रपूर शहरात करोनाची दुसरी लाट उच्च पातळीवर होती. यामुळे हजारो रुग्ण दररोज रुग्णालयात भरती होत होते. करोना रुग्णासाठी आवश्यक व्हेंटीलेटर, ऑक्सीजन, बेड, इंजेक्शन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. अशी भयानक परिस्थिती असताना केंद्र, राज्य सरकारने देखील करोना उपचारासाठी पैसे खर्च करण्यास प्राध्यान्य देण्याचे आदेश दिले होते.

मात्र, चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत मनपा महापौरसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या V.I.P. क्रमांकासाठी 70,000 / – रुपये जनतेच्या कर रुपी पैशातून खर्च केले आहे. हा प्रकार जनतेचा विश्वासघात करणारा आहे. यामुळे चंद्रपूर शहर मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर पदाचा दुरुपयोग करुन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा ठपका ठेवून कडक कारवाई करीत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.
सोलापूरकरांनो सावधान! फोटोमधील ४ अट्टल कैद्यांनी आज जे केलं ते वाचून हादराल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.