Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
- ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू नाही असे सांगून केंद्र सरकार खोटे बोलत आहे , असे राऊत यांनी म्हटले होते.
- संजय राऊत हे महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार आहेत का?- चित्रा वाघ.
चित्रा वाघ यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट करत हे प्रश्न उपस्थित केले आहेत. वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘संजय राऊत यांना शब्द सूचत नाहीत, असं कानावर आलं आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. मग आम्हालाही काही प्रश्न पडलेत, की मे महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता संजय राऊत हे महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार आहेत का? आतापर्यंत केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले, याची माहिती दिली आहे का? किंवा ते आता देणार आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीची माहिती जर संपादकांना कुणी देत असेल, तर याची जबाबदारी कोणावर निश्चित करणार?’
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले; पडळकरांनी साधला निशाणा
क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांची CBI च्या FIR विरोधातील याचिका; कोर्टाचा गुरुवारी फैसला
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारने लेखी उत्तरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असे म्हटलेले आहे, हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. केंद्र सरकावर ताशेरे ओढताना ते पुढे म्हणाले की, तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारले पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, त्यांचा यावर विश्वास बसतोय का?… जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवे, असे सांगतानाच सरकार खोटे बोलत आहे, असे राऊत म्हणाले.
क्लिक कर आणि वाचा- एएएचएलचे मुख्यालय गुजरातमध्ये हलवणार का?; अदानी समूहाने केला ‘हा’ खुलासा
ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे रुग्ण मरण पावले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार मात्र सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगॅससचा परिणाम असून सरकार भ्रमिष्ट झाले आहे, असेही राऊत पुढे म्हणाले.