Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कन्यादानाचे पुण्य
कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात.
अश्याप्रकारे सजवा तुळशीचे रोपटे
दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढण्यात येते. फ्लॅट संस्कृतीत अनेकांनी तुळशीला आपल्या बाल्कनीत जागा दिली असून त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली जातेय. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा. तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर छान रांगोळीही काढण्यात येते.
गौरीप्रमाणे पूजा
प्रत्येकजण आवडी प्रमाणे आणि हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात.तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात.
तुलसी विवाहाची पूर्वापार पद्धत
लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी, यजमानाने म्हणजे श्रीकृष्णाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसवावे.
गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते.
कार्तिक महिन्यात काय वर्ज्य करावे जाणून घ्या