Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- चिपळूणला पुराच्या पाण्याचा वेढा कायम
- मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
- एनडीआरएफसह इतर अनेक मदत पथके दाखल
- आठ बोटींच्या मदतीने केली जातेय नागरिकांची सुटका
एनडीआरएफची (NDRF) चार पथके रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचली असून त्यातील दोन पथकांनी चिपळूणमध्ये मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. दापोली तालुक्यातील हर्णे व दाभोळ येथूनही होडी आणि बोटी घेऊन पट्टीचे पोहणारे पथक चिपळूण येथे दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशनची टीम सुद्धा चिपळूणला पोहोचली आहे. रत्नागिरीतून ‘हेल्पिंग हँड’चे कार्यकर्तेही पोहोचले आहेत. मालवण येथील आपत्कालीन ग्रुपचे २२ जणांचे पथक तीन इंजिन बोटींसह मुंबई-गोवा मार्गे लवकरच दाखल होत आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी वायरलेसद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिपळूणमध्ये १५ बोटी उपलब्ध असून त्यापैकी ८ बोटींमार्फत बचावकार्य सुरू आहे.
वाचा: कोल्हापूरमध्ये पुरात बुडालेल्या गाड्यांतून NDRF ने ३६ जणांना वाचवले
चिपळूण परिसरातील संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. वीजपुरवठा खंडित असून मोबाइलही बंद आहेत. त्यामुळं मदतकार्यात अडथळे येत आहेत. सध्या संदेशवहन केवळ पोलीस वायरलेसच्या माध्यमातून सुरू आहे. मदतीसाठी काही हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
हेल्पलाइन क्रमांक:
नंदू चव्हाण: ८३२९३ ३७३३९
कौस्तुभ सावंत : ९८२२९ ८८०८०
महेश गर्दे : ९४२२० ०३१२८
सचिन शिंदे : ८००७८ ४११११
चिपळूणमध्ये मदतकार्य आणि अन्न पुरवठा सुरु, अनिल परब यांनी दिली माहिती
खेड शहरातील पूरस्थिती नियंत्रणात, पण अॅलर्ट कायम
दिलासादायक बाब म्हणजे, खेड शहरातील पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. येथील पाणी ओसरत असून गांधी चौक येथे पाणीपातळी चार फुटांनी कमी झाली आहे. मात्र, पिंपळवाडी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळं अॅलर्ट कायम आहे, अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोणे यांनी दिली आहे. चिपळूण गोवळकोट रोड येथील पाणी पातळी तीन फुटांनी कमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
वाचा: कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले; अनेक ट्रेन रद्द